Baramati bypoll : बारामतीत 23 उमेदवार रिंगणात, सुनेत्रा पवारांना किती मताधिक्य मिळणार? जय पवारांनी आकडाच सांगितला...

Baramati bypoll 23 candidates, Sunetra Pawar lead prediction : उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर जय पवार यांनी काँग्रेसला शब्द दिला आहे. यावेळी त्यांच्याशेजारी अर्ज मागे घेतलेले उमेदवार आकाश मोरेही होते.
Jay Pawar Sunetra Pawar
Jay Pawar Sunetra Pawar sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra election 2026 news : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्याला यश आले नाही. त्यामुळे आता निवडणूक होणार असून या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना किती मताधिक्य मिळणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

बारामतीच्या पोटनिवडणुकीत आता एकूण २३ उमेदवार उरले आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह करुणा मुंडे, अभिजित बिचुकलेंचाही समावेश आहे. अपक्ष उमेदवारांची मनधरणी करण्याचा बराच प्रयत्न झाला. पण त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश आले नाही. याबाबत राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी स्पष्ट केले.

कालपासून आम्ही सर्वच उमेदवारांना भेटतोय. उमेदवारांच्या संपर्कात होतो. त्यांच्या छोट्या छोट्या समस्या होत्या. आम्ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले, असे जय पवारांनी सांगितले. निवडणूक झाल्यास सुनेत्रा पवार यांना किती मताधिक्य मिळेल, या प्रश्नावर बोलताना जय पवार यांनी एक लाखांहून अधिक लीड मिळेल, असे सांगितले.

Jay Pawar Sunetra Pawar
Jay Pawar news : उमेदवारी मागे घेताच जय पवारांनी काँग्रेसला दिला मोठा शब्द; राजकीय समीकरणं बदलणार?

कन्हेरी येथून प्रचाराला सुरूवात

कन्हेरी येथून सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू होणार असल्याचे जय पवार म्हणाले. कन्हेरी येथे पाया पडून अजितदादांना श्रध्दांजली वाहिली जाईल. तिथे आम्ही अर्धा तास बसू, पण सभा होणार नाही. त्यादिवशी प्रचारही करणार नाही. दुसऱ्या दिवसापासून प्रचार करू, अशी माहिती जय पवार यांनी दिली. बारामती विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरूवात पवार कुटुंबाने प्रत्येकवेळी कन्हेरी येथूनच केली आहे.

Jay Pawar Sunetra Pawar
IAS couple in Maharashtra : IAS पत्नीसाठी पतीने बदलले केडर; आता महाराष्ट्रातील एका जिल्ह्याचा कारभार या जोडीच्या खांद्यावर...

काँग्रेसला शब्द

उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर जय पवार यांनी काँग्रेसला शब्द दिला आहे. यावेळी त्यांच्याशेजारी अर्ज मागे घेतलेले उमेदवार आकाश मोरेही होते. आकाश मोरे आपल्याबरोबर आहेत. आता त्यांनी माघार घेतलीय. त्यामुळे कुठेतरी आमच्याही मनाला बरे वाटतंय की, सगळेच पक्ष एकत्रित येऊन दादांसाठी ही निवडणूक लढतील. भविष्यात त्यांच्याही पक्षाच्या काही अडचणी असतील, त्यामध्ये आम्ही त्यांना साथ देऊ. काँग्रेसचे मी मनापासून आभार मानतो, असा शब्द जय पवार यांनी काँग्रेसला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com