Narendra Modi Sarkarnama
देश

Partition Horrors Remembrance Day: पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली; फाळणीच्या स्मृती जागवल्या...

Rashmi Mane

Partition Horrors Remembrance Day : फाळणी स्मृतिदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमानुष दु:ख आणि वेदना सहन केलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली आहे. फाळणीमुळे लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले. काही लोकांना प्राणही गमवावे लागले.

त्यामुळे देशाच्या फाळणीची वेदना कधीही विसरता येणार नाही. त्या लोकांचा संघर्ष आणि त्याग लक्षात ठेवून. 14 ऑगस्ट हा 'विभाजन विभीषिका स्मृती दिवस' #PartitionHorrorsRemembranceDay म्हणून साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 2021 मध्ये घेतला होता.

भारत आज 14 ऑगस्ट रोजी विभाजन विभीषिका स्मृती दिवस साजरा करत आहे. यावेळी पीएम मोदी यांनी 'X' वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की,,#PartitionHorrorsRemembranceDay 'फाळणीमुळे असंख्य लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यांच्या धैर्याला श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस आहे, फाळणीच्या वेळी ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.

फाळणीमुळे प्रभावित झालेल्या अनेकांनी आपले जीवन पुन्हा उभारले आणि प्रचंड यश मिळवले. आज, आम्ही आमच्या राष्ट्रातील एकता आणि बंधुत्वाच्या बंधनांचे नेहमी रक्षण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो.'

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने (BJP) एक खास व्हिडीओ पोस्ट करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. '१४ ऑगस्ट हा दिवस फाळणीचा स्मृती दिन म्हणून केवळ भेदभाव, वैमनस्य आणि दुर्भावना यांचे विष नाहीसे करण्याची आठवण करून देणार नाही, तर ते निर्माणही करेल. एकता आणि सामाजिक सौहार्दाची भावना देखील मजबूत होईल. चला, फाळणीच्या भीषणेला तोंड देणाऱ्या त्या शूर सुपुत्रांना सलाम करूया.

विभाजन विभीषिका स्मृती दिवस म्हणजे काय?

1947 मध्ये या दिवशी भारत आणि पाकिस्तानमध्ये फाळणी झाली तेव्हा अनेकांना प्रचंड त्रासातून जावे लागले. फाळणी झाल्यामुळे अनेक दंगलीही झाल्या. या दंगलींमुळे लाखो लोकांना नव्या शहरात किंवा ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागले.

या काळात अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ दरवर्षी 14 ऑगस्ट हा दिवस 'विभाजन विभीषिका स्मृती दिवस' म्हणजे 'फाळणी वेदना स्मरणदिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.

त्या सर्व लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाचे स्मरण करून दरवर्षी 14 ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जाईल, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली होती. फाळणीचे दु:ख कधीच विसरता येणार नाही, असे ते म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT