Independence Day : ध्वजारोहणावरून तापलं राजकारण; प्रशासनाने मंत्र्यांचा आदेश धुडकावला...

Arvind Kejriwal Atishi Flag Hoisting : अरविंद केजरीवाल यांनी ध्वजारोहणासाठी अतिशी यांचे नाव सुचवले होते. तसे गोपाल राय यांनी प्रशासनाला आदेश दिले होते.
National Flag Hoisting
National Flag HoistingSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : दिल्लीत स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणावरून राजकारण तापू लागलं आहे. मुख्यमंत्री अरविंदे केजरीवाल तिहार जेलमध्ये असल्याने दिल्ली सरकारच्या मुख्य कार्यक्रमात ध्वजारोहण कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. केजरीवालांनी मंत्री अतिशी यांचे सुचवलेले नाव प्रशासनाने नाकारले आहे.

दिल्ली सरकारमधील सामान्य प्रशासन मंत्री गोपाल राय यांनी आतिशी या ध्वजारोहण करतील, असे पत्र विभागाला दिले होते. त्यानुसार नियोजन करण्याचे आदेश राय यांच्याकडून देण्यात आले होते. पण काही तासांतच प्रशासनाने राय यांचे हे आदेश धुडकावून लावले आहेत. त्यामुळे आतिशी या ध्वजारोहण करू शकणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे.

National Flag Hoisting
Mamata Banerjee : …तर ‘ती’ केस CBI कडे देणार! ममतांनी आपल्याच पोलिसांना दिला अल्टिमेटम

दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी केजरीवाल जेलमध्ये आहेत. त्यामुळे ध्वजारोहणाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. राय यांनी सोमवारी प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात म्हटले होते की, केजरीवाल यांनी अतिशी या ध्वजारोहण करतील, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे तचे नियोजन करावे.

सामान्य प्रशासन विभागाचे नवीन कुमार चौधरी यांनी राय यांनी दिलेल्या उत्तरात आतिशी ध्वजारोहण करू शकणार नाहीत, असे म्हटले आहे. नियमांचा आधार घेत विभागाने राय यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असून निर्णयाची प्रतिक्षा असल्याचे उत्तर विभागाने दिले आहे.

National Flag Hoisting
IAS Kumar Ravi : दिवसभर मुख्यमंत्र्यांसोबत फिरले IAS अधिकारी अन् सायंकाळी थेट मंत्रालयात बदली...

प्रशासनाच्या या भूमिकेवरून आपच्या नेत्यांनी नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्यावर निशाणा साधला आहे. माजी उपमुख्यमंत्री व पक्षाचे नेते मनीष सिसोदिया म्हणाले, स्वातंत्र्यदिनावरून गलिच्छ राजकारण सुरू आहे. जेलमध्ये असलेला गुन्हेगार सुकेश जेव्हा पत्र लिहितो तेव्हा तिहार प्रशासन लगेच नायब राज्यपालांना ते पत्र देतात, त्यावर ते लगेच आवश्यक कार्यवाहीही करतात. पण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पत्र लिहितात तेव्हा नायब राज्यपाल तिहार प्रशासनाला पत्र पाठवू नका असे सांगतात. त्यांना स्वातंत्र्यदिनाशी, देशाशी काही देणेघेणे नाही, अशी टीका सिसोदिया यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com