IAS Pooja Khedkar Sarkarnama
देश

Pooja khedkar : पूजा खेडकर विरोधात निकाल देताना न्यायालयाच्या 'त्या' आदेशाने अधिकाऱ्यांची धडधड वाढली!

Patiala court delhi Pooja khedkar UPSC : पूजा खेडकर यांच्या विरोधात यूपीएससीकडून बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पूजा यांनी अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.

Roshan More

Pooja khedkar News : अपंगत्वाच्या बनावट कागदपत्रांद्वारे IAS केडर मिळवणाऱ्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन पटियाला न्यायालयाने फेटाळला. मात्र, जामीन फेटाळत असताना न्यायालयाने यूपीएससीला पात्र नसताना चुकीच्या पद्धतीने सूट मिळवली, अशा लोकांचा शोध घेण्यासही सांगितले आहे.

न्यायालयाचे निर्णयाने यूपीएसी बनावट कागदपत्रांद्वारे पद मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे अपंगत्वाचे बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांची धडधड वाढणार आहे.

पूजा खेडकर यांच्या विरोधात यूपीएससीकडून बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्या प्रकरणी दिल्लीत गुन्हा दाखल होता. या प्रकरणात पूजा यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केले होता. मात्र, न्यायालयाने पूजा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

'त्या' लोकांचा शोध घ्या

बनावट अपंगत्वाच्या आधारे IAS मिळवणाऱ्या तसेच यूपीएससीची परीक्षा नावात बदल करत 11 वेळा देणाऱ्या पूजा खेडकर हिला कोणाची मदत आहे का? यूपीएससीमधून तिला कोणी मदत केली आहे का? याचाही शोध घेण्याचे निर्देश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत.

250 जणांची बनावट कागदपत्रे?

यूपीएससी पाठोपाठ 'एमपीएससी'मध्ये देखील दिव्यांग असल्याची खोटी प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवल्याचे आरोप केले जात आहेत. एका विद्यार्थी संघटनेने याबाबत एक सर्व्हे केला असून 250 जणांची यादी तयार केली आहे, ही यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT