Mumbai MVA News : मुंबईत ठाकरेंना काँग्रेसच देणार धक्का; 16 जागांवर इच्छुकांची तयारी

Congress, shivsena UBT news : मुंबईतील 34 जागापैकी जवळपास 16 जागा लढण्याची चाचपणी काँग्रेसने गेल्या काही दिवसापासून सुरु केली आहे. त्यामध्ये ठाकरे गटाचे आमदार असलेल्या जागा आहेत.
Uddhav thackeray Nana Patole
Uddhav thackeray Nana Patole Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे आघाडीच्या कॉन्फिडन्समध्ये दुपटीने वाढ झाली आहे. त्यातच आगामी काळात होत असलेली विधानसभा निवडणूक तोंडावर आली असल्याने तीनही घटक पक्षाने वेगाने तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेसने मुंबईत यात्रेचे आयोजन केले असून मुंबईतील ठाकरे गटाच्या काही जागांवर काँग्रेसचा डोळा असल्याचे पुढे आले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने (Congress) तयारीचा वेग वाढविला आहे. राज्यासह मुंबईतील अनेक जागांसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणीस सुरुवात केली असून मुंबईतील 34 जागापैकी जवळपास 16 जागा लढण्याची चाचपणी काँग्रेसने गेल्या काही दिवसापासून सुरु केली आहे. त्यामध्ये ठाकरे गटाचे आमदार असलेल्या जागा आहेत. त्यामुळे येत्या काळात यावर महाविकास अगदी कसा मार्ग काढणार याकडे लक्ष लागले आहे. (Mumbai MVA News)

मुंबईतील जिल्हाध्यक्षांना निवडणुकीच्या कामाच्या तयारीला लागण्याचे सांगण्यात आले आहे. या 16 जागांमध्ये कुलाबा, मुंबादेवी, भायखळा, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम यांसारख्या मतदारसंघाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यातील काही ठिकाणी सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत.

शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला असलेल्या वांद्रे पूर्व येथे काँग्रेसचे झिशान सिद्दीकी सध्या आमदार आहेत. परंतु पारंपरिकरित्या ही जागा ठाकरे गट यापूर्वी जिंकत आला आहे. त्यामुळे येत्या काळात या जागेवर कोण निवडणूक लढणार याची उत्सुकता लागली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसकडून काही दिवसांपूर्वीच जागावाटप निश्चित करण्यासाठी दहा जणांची समन्वय समिती जाहीर करण्यात आली आहे. तत्पूर्वी पक्षाच्या राज्यातील बड्या नेत्यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे बैठक पार पडली.

Uddhav thackeray Nana Patole
Kolhapur News : माजी नगरसेवकाचे कोल्हापूरच्या खड्ड्यात 'स्विमिंग'; वैतागलेल्या लोकप्रतिनिधीच अनोखं आंदोलन

या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जागा आणि इतर मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली आहे. येत्या 7 ऑगस्टला मुंबईत महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षात जागावाटपाची बैठक होणार आहे. त्यामध्ये जागा निश्चित करण्यात येणार आहेत.

मुंबईतील काँग्रेसच्या सर्व जिल्हाध्यक्षांची एक बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये या बैठकीत सर्व जिल्हाध्यक्षांना मुंबई काँग्रेस चाचपणी करीत असलेल्या सर्व मतदारसंघाची यादी देण्यात आली. या यादीतील मतदारसंघात कार्यक्रमाचे आयोजन करण्याची सूचना दिली आहे.

त्याशिवाय विभागातील सर्व प्रश्नांची यादी लवकरात लवकर सादर करण्याचे आदेशही पक्षाकडून देण्यात आली आहेत. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस तयारी करीत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे जागावाटप करीत असताना महाविकास आघाडीतील घटक पक्ष काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Uddhav thackeray Nana Patole
BJP Vs Congress : नागपुरात राजकारण पेटलं; फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण, भाजप- काँग्रेसमध्ये जुंपली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com