नवी दिल्ली : पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल (hardik patel) आज (2 जून) भाजपमध्ये (bjp) प्रवेश करीत आहेत. पटेल काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. (Hardik Patel latest News)
भाजपामध्ये प्रवेश करण्याआधी हार्दिक पटेल यांनी सकाळी ट्विट करत भाजपप्रवेशाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "आपण देशसेवेच्या उदात्त कार्यात एक छोटा शिपाई होऊन काम करणार असल्याचं त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
“राष्ट्रहित, राज्यहित, जनहित आणि सामाजिक हित या भावनेतून मी आजपासून एका नव्या अध्यायाला सुरुवात करणार आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेच्या उदात्त कार्यात मी एक लहान सैनिक म्हणून काम करेन”, असे टि्वट हार्दिक पटेल यांनी केले आहे.
हार्दिक पटेल गांधीनगरमधील भाजप कार्यालयात पक्षाचे सदस्यत्व स्वीकारणार आहेत. भाजपच्या गुजरात युनिटचे अध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेल पक्षात प्रवेश करणार आहेत. हार्दिकसह 15 हजार कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
दुसरीकडे, पाटीदार आंदोलनादरम्यान हार्दिकला त्याच्यावर सुरू असलेल्या खटल्याबाबत न्यायालयाने दिलासा दिला आहे. अशा स्थितीत हार्दिकचा निवडणूक लढवण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात हार्दिक पटेल यांनी प्रदेश काँग्रेस नेत्यांवरही टीका केली आहे. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. ‘‘गुजरात आणि गुजरातींबद्दल द्वेष असल्यासारखे पक्षाच्या नेतृत्वाचे वर्तन होते, मी अनेकदा गुजरातमधील समस्यांकडे नेतृत्वाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला़ मात्र, जेव्हा-जेव्हा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून काही मुद्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाइलवर अधिक लक्ष असल्याचे आढळल़े. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे गांभीर्याचा अभाव असल्याचे दिसले’’, अशी टीका करत हार्दीक पटेल यांनी राहुल गांधी यांना लक्ष्य केल़े आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.