"टोमणे सभेत" 'या' प्रश्नांची उत्तरे ढोंगी हिंदुत्ववादी देणार का ? मनसेचा हल्लाबोल

मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी टि्वट करीत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हिंदुत्वावर टीका केली आहे.
Gajanan Kale News, CM Uddhav Thackeray News, MNS news update in Marathi
Gajanan Kale News, CM Uddhav Thackeray News, MNS news update in Marathisarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : मराठवाड्यातील पहिल्या शिवसेना शाखेचा वर्धापनदिन येत्या ८ जून रोजी साजरा होत आहे. या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होत आहे. या जाहीर सभेबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (mns) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (MNS news update in Marathi)

मनसे प्रवक्ते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी टि्वट करीत मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हिंदुत्वावर टीका केली आहे. गजानन काळे यांनी टि्वट करुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री ८ जूनच्या सभेत देतील का? असा सवाल काळे यांनी उपस्थित केला आहे.

"बाबरी मशीद पडली म्हणून मुस्लिम समाजाची माफी मागणाऱ्या मुलायमसिंग यादवांच्या समाजवादी पक्षाच्या अबू आझमीसोबत सत्तेचा पाट का मांडला ? संभाजीनगरला शिवसेनेचा विधानपरिषदेचा आमदार अंबादास दानवे एमआयएमच्या नगरसेवकांची मदत घेऊन का करावा लागला ? याचे उत्तर संभाजीनगरच्या ८ जुन ला होणाऱ्या "टोमणे सभेत"ढोंगी हिंदुत्ववादी देणार का ? अशी विचारणा काळे यांनी टि्वटमध्ये केली आहे.

आगामी महापालिका निवडणुका, १ मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झालेली जाहीर सभा आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २३ मे रोजी काढलेला जल आक्रोश मोर्चा या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या ८ जूनच्या सभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

कुठल्याही परिस्थितीत ही सभा रेकॉर्डब्रेकच झाली पाहिजे या दृष्टीने शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. (Aurangabad जाहीर सभेच्या व्यासपीठ व इतर कामांच्या उभारणीचा प्रारंभ शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते स्तंभपूजनाने नुकताच करण्यात आला. यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com