bjp flag sarkarnama
देश

BJP Leader Shot Dead : भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, परिसरात एकच खळबळ

Akshay Sabale

भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. सोमवारी ( 9 सप्टेंबर ) पहाटेच्या सुमारास घडलेल्या घटनेनं एकच खळबळजनक उडाली. बिहारची राजधानी येथे हा प्रकार समोर आला आहे. श्याम सुंदर उर्फ मुन्ना शर्मा असं मृत भाजप नेत्याचं नाव आहे. ते पाटणा सिटी चौक नगर मंडळचे माजी अध्यक्ष होते.

गोळीबाराच्या घटनेनंतर शर्मा यांना कुटुंबियांनी रूग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, रूग्णालयात दाखल करण्यापूर्वी शर्मा यांचा मृत्यू झाला होता. घटनास्थळाचे सीसीटीव्ही व्हिडिओ तपासण्याचे काम पोलिस करत आहेत.

मुन्ना शर्मा यांच्या मित्रानं सांगितलं, शर्मा हे पाटणा भाजप ( bjp ) सिटी चौक नगर मंडळाचे अध्यक्ष होते. रोज सकाळी आम्ही मंगळ तळ्यावर मॉर्निंग वॉकसाठी जात होते. पण, सकाळी आम्ही आल्यावर त्यांची हत्या झाल्याचे कळले.

त्यानंतर त्या भागातील सीसीटीव्ही व्हिडिओ काढून तपासण्यात आले. त्यात मुन्ना शर्मा हे मंदिरातून दर्शन करून बाहेर पडले आणि कुणासोबत तरी बोलत होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मुन्ना शर्मा यांच्या गळ्यातील सोन्याची चैन, मोबाईल हिसकावला आणि डोक्यात गोळी मारून हत्या केली. हत्येनंतर हल्लेखोर फरार झाले.

मात्र, हत्येची घटना चोरीच्या उद्देशानं होती की अन्य काही कारणातून याचा तपास सुरू आहे. कारण, मुन्ना शर्मा यांच्या गळ्यातील चैन तशीच होती. डोक्यात पाठीमागून मुन्ना शर्मा यांना गोळी मारण्यात आली होती. एकाच गोळीनं त्यांचा मृत्यू झाला होता. पण, तपासात शर्मा यांच्या हत्येचं कारण समोर येईल.

नातेवाईकांना सोडायला आले अन्...

रविवारी मुन्ना शर्मा यांच्या घरी एक कौटुंबिक कार्यक्रम होता. त्यासाठी नातेवाईक सुद्धा आले होते. त्यांना सोमवारी पहाटे सोडण्यासाठी शर्मा हे मंगळ तळ्याजवळ गेले होते. तेव्हा, गोळीबाराची घटना घडली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT