Patna opposition meeting Sarkarnama
देश

Patna Opposition Meeting : मोदींचा विजयाचा वारु रोखण्यासाठी विरोधकांनी ठरवली ही रणनीती..

सरकारनामा ब्यूरो

Patna News : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला हरविण्यासाठी विरोधी एकजुटीच्या गंभीर प्रयत्नांचा भाग म्हणून पाटण्यात काल (शुक्रवारी) बैठक झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी नेते या बैठकीला उपस्थित होते

मतविभागणी होऊ नये, यासाठी भाजपविरोधात एकसंध विरोधी पक्षाचा उमेदवार असावा यावर लक्ष केंद्रीत राहिले. १०-१२ जुलै रोजी शिमला येथे जागावाटप, समान अजेंडा व इतर मुद्द्यांवर बैठक होईल. नितीश म्हणाले, "शिमला बैठकीत बरेच निश्चित होईल. आम्ही एकजुटीने भाजपला सत्तेतून बेदखल करू," असे खर्गेसह सर्व नेते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून कसे दूर ठेवता येईल, यासाठी या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. सुमारे पाच तास झालेल्या या बैठकीनंतर नेत्यांची पत्रकार परिषद झाली. यात त्यांनी बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. मोदींनी सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांनी रणनीती ठरवली. याबाबत जाणून घेऊया.

पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हे सांगणार नाही?

विरोधी पक्षांना त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण, हे सांगावे, असे भाजप नेत्यांचे म्हणणं आहे. मोदींच्या विरोधात पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण, असे प्रश्न भाजप विचारत आहे. "मोदींच्या विरोधात कोण ? यापेक्षा एकत्र येऊन त्यांच्याविरोधात लढणार. पंतप्रधान कोण याबाबतचा निर्णय नंतर घ्यावा, असे या बैठकीत ठरविण्यात आले आहे.

पहिल्यांदा अजेंडा तयार करणार नंतर लढाई

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठकीत दूसरा फॉर्मूला सांगितला. आगामी लोकसभेसाठी सर्वाची लढाई ही भाजपच्या विरोधात आहे. त्यासाठी सुरवातीला अजेंडा ठरविण्यात येईल, आपल्या राज्यात भाजपच्या विरोधात कसे लढता येईल. यासाठी जुलैमध्ये हिमाचल प्रदेशात शिमला येथे पुन्हा एका बैठकीचे आयोजन केले आहे.

ज्याठिकाणी भाजप कमकुवत आहे, तेथूनच सुरवात

ममता बॅनर्जी म्हणाल्या, "स्थानिक पातळीवर ज्या ठिकाणी भाजप कमकुवत आहे. त्याठिकाणी रणनीती ठरविण्यात येणार आहे. बिहारमध्ये आरजेडी आणि जेडीयू या स्थानिक पक्षांचे भाजपसमोर मोठे आवाहन आहे. अशाच प्रकारची परिस्थिती कुणे आहे, यावर फोकस असेल,"

मोदीच्या विरोधात एकत्र येऊन लढणार

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी सांगितले की २०२४ची लोकसभेची निवडणूक विरोधी पक्ष एकत्र लढणार आहेत. याबाबत या बैठकीला उपस्थित सर्व नेत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT