BJP Vs Uddhav Thackeray: शेलारांच्या या सहा प्रश्नांची उत्तरं ठाकरे देतील का ?

Ashish Shelar's Questions To Uddhav Thackeray: एवढं एवढं पाणी आणि गोलगोल "गाणी"
Uddhav Thackeray | Ashish Shelar
Uddhav Thackeray | Ashish ShelarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे हिंदुत्व दुटप्पी असल्याचा आरोप नुकताच केला होता. या आरोपाला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी सहा प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांची ठाकरे काय उत्तर देतील, याकडे सगळ्याचे लक्ष आहे.

आशिष शेलार यांनी टि्वट करीत उद्धव ठाकरे यांना हे सहा प्रश्न केले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्दांवरुन उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर नेहमी जहरी टीका केली आहे. त्याला शेलारांनी प्रत्युत्तर दिले आहे. औरंगाबाद की छत्रपती संभाजीनगर? काँग्रेस की हिंदुत्व? कबर की स्मारक? असे विविध प्रश्न शेलारांनी ठाकरेंना विचारला आहेत.

शेलार आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "'शब्दांची कोटी न करता.. मर्द, खंजीर...असले शब्द न वापरता... उबाठा प्रमुखांनी महाराष्ट्राला स्पष्ट शब्दात सांगावे...यापैकी नेमके काय? कि दोन्ही? नाही तर लहानपणीचा खेळ.. एवढं एवढं पाणी आणि गोलगोल "गाणी", असे शेलार यांनी म्हटले आहे.

बिहारच्या पाटण्यात विरोधी पक्षाच्या बैठकीला सुरवात झाली आहे. या बैठकीवरुन पाटण्याच्या रस्त्यावर पोस्टर वॉर रंगले आहे. देशातील १५ विरोधी पक्षाचे वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीवर शेलारांनी टोमणा लगावला आहे. "पाटण्यात सर्व दुबळे एकत्र येत आहेत," अशा शब्दात शेलारांनी या बैठकीची खिल्ली उडवली आहे.

Uddhav Thackeray | Ashish Shelar
Patna Opposition Meeting: मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत तुम्ही व्यासपीठ शेअर करणार आहात का? मनसेचा ठाकरेंना प्रश्न; दुहेरी भूमिका कशी?

पाटण्यातील बैठकीला उद्धव ठाकरे आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या उपस्थितीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. ते एका वृत्तवाहिनीसी बोलत होते.

Uddhav Thackeray | Ashish Shelar
Patna 0pposition Meeting : पाटण्यात रंगलयं पोस्टर वॉर ; 'घराणेशाही' विरुद्ध 'मोहब्बत की दुकान'...

"ज्या मेहबुबा मुफ्ती सईद यांच्यासोबत सत्ता स्थापन केली म्हणून तुम्ही आयुष्यभर (भाजपाला) टोमणे मारले, त्या सईद यांच्यासोबत तुम्ही बसणार आहात का? दुसऱ्यांनी केली की ती गद्दारी आणि तुम्ही केलं की ती देशभक्ती अशी दुहेरी भूमिका कशी काय असू शकते?" असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे . "स्वतःच्या स्वार्थाची वेळ आली की वेगळे निकष आणि इतरांसाठी वेगळे निकष का?” असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी ठाकरेंनी केला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com