Fuel Price Hike Sarkarnama
देश

महाराष्ट्रापेक्षा पेट्रोल 15 रुपयांनी स्वस्त! गुजरात सीमेवरील पंपांवर लागले फलक

केंद्र व राज्य सरकारने कर कपात केल्यामुळे राज्यातील पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे 11 रुपये 58 पैसे आणि 8 रुपये 44 पैशांनी कमी झाले आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी करात शनिवारी प्रतिलिटर अनुक्रमे 8 रुपये तर डिझेलवर 6 रुपये कपात केली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारनेही मुल्यवर्धित करात कपात करत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. पण त्यानंतरही महाराष्ट्रातील दर अन्य राज्यांचे तुलनेत अधिक आहेत. आता तसे फलक गुजरात सीमेवरील पेट्रोल पंपांवरही लागले आहेत. (Petrol Diesel price hike News)

केंद्र व राज्य सरकारने कर कपात केल्यामुळे राज्यातील पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे 11 रुपये 58 पैसे आणि 8 रुपये 44 पैशांनी कमी झाले आहेत. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचे दर हे दर 09.45 तर पुण्यात 108.87 पैसे, नाशिकमध्ये 109.75, नागपूरमध्ये 109.35, औरंगाबादमध्ये 110. 95 रुपये झाले आहेत. पण हे दर गुजरातपेक्षा अधिक आहेत. (Petrol Price in Maharashtra)

त्यामुळे महाराष्ट्रात गुजरात सीमेजवळ राहणारे अनेक वाहनचालक तिकडच्या पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी जात आहेत. या पेट्रोल पंपांवरही महाराष्ट्रापेक्षा 15 रुपयांनी स्वस्त पेट्रोल मिळत असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सीमेवरील पंपावर वाहन चालकांची गर्दी होत आहे.

याविषयी बोलताना गुजरातमधील वलसाड येथील एका पेट्रोल पंप मालकाने सांगितले की, इथून महाराष्ट्र सीमा दोन किलोमीटरवर आहे. महाराष्ट्रात पेट्रोल 14 रुपये आणि डिझेल साडे तीन रुपयांनी महाग असल्याने लोक इथे इंधन भरण्यासाठी येत आहेत.

महाराष्ट्रातील एका ग्राहक म्हणाला की, मी दररोज कामानिमित्त गुजरात- महाराष्ट्र सीमेवरून जातो. पण गुजरातमधील पंपांवर पेट्रोल खरेदी करतो. त्यामुले प्रति लिटर 14 रुपये वाचतात. दर महिन्याला सुमारे तीन हजार रुपयांची बचत होते, असं या ग्राहकाने सांगितले.

दरम्यान, मोदी सरकारने गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडूनही दरवाढ थांबवण्यात आली होती. नंतर ती पुन्हा सुरू झाली होती. त्यावेळी सर्व भाजपशासित राज्यांसह काही विरोधी पक्षांच्या राज्यांनीही दर कमी केले. पण महाराष्ट्र सरकारने कपात केली नव्हती. आता दुसऱ्यांदा केंदाने कपात केल्यानंतर राज्य सरकारनेही दर कपात केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT