शिवसेनेचं ठरलं; राज्यसभेसाठी संभाजीराजेंऐवजी कोल्हापुरातीलच संजय पवार

संभाजीराजे यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव देण्यात आला होता.
CM Uddhav Thackeray, Sanjay Pawar Latest Marathi News
CM Uddhav Thackeray, Sanjay Pawar Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना राज्यसभेसाठी शिवसेना पाठिंबा देणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे. सहाव्या जागेसाठी कोल्हापूरातीलच संजय पवार यांच्या नावावर शिवसेनेने शिक्कामोर्तब केलं आहे. लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली. (Shiv Sena Leader Sanjay Pawar may be the Rajya Sabha Candidate)

संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या प्रस्तावाला प्रतिसाद न दिल्याने अखेर शिवसेनेने आपला उमेदवार निश्चित केला आहे. सुरूवातीला ज्येष्ठ नेत्यांना या जागेवर संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण कोल्हापूरातीलच संजय पवार हे नाव अचानक चर्चेत आलं होतं.(Rajya Sabha Election Latest Marathi News)

CM Uddhav Thackeray, Sanjay Pawar Latest Marathi News
मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा, पुढे काय करायचं ते ठरलंय! संभाजीराजेंच्या गुगलीनं उत्सुकता शिगेला

कोण आहेत संजय पवार?

संजय पवार हे कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख आहेत. कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित असलेले पवार हे मागील 25 ते 30 वर्षांपासून पक्षात सक्रीय आहेत. एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांकडे पाहिले जाते. कोल्हापूर महापालिकेत ते नगरसेवकही होते. सीमाप्रश्नी त्यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच ते कोल्हापूरातीलच असल्याने शिवसेनेने त्यांच्या नावाला पसंती दिल्याचे समजते. मराठा उमेदवार देऊन शिवसेनेने समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

संभाजीराजे यांनी नकार दिल्याने कोल्हापूरातीलच उमेदवार देण्यावर शिवसेनेच गांभीर्याने विचार सुरू केला होता. त्यासाठी संजय पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. नेत्यांशी दांडगा संपर्क असलेले संजय पवार ग्रामीण भागातील असून शिवसेनाही ग्रामीण चेहऱ्याच विचार करत होती. अखेर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

CM Uddhav Thackeray, Sanjay Pawar Latest Marathi News
विधान परिषदेची दहावी जागा कुणाला? गुप्त मतदानामुळे आघाडीसमोर आव्हान...

राज्यसभेसाठी चुरस वाढली

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे. संभाजीराजेंनी अपक्ष उभे राहण्याची घोषणा करत सर्व पक्षांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. पण संख्याबळानुसार पहिल्या पसंतीची सर्वाधिक अतिरिक्त मते शिवसेनेकडे उरतात. त्यामुळे संभाजीराजेंनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार व्हावे, असा प्रस्ताव देण्यात आला होता. पण आता संभाजीराजेंना अपक्ष म्हणून लढावे लागणार आहे. त्यामुळे आता या निवडणुकीतील चुरस वाढणार आहे.

दबाव वाढवण्याचा प्रयत्न

दरम्यान, राज्यसभेत जाण्यासाठी इच्छुक असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी आता मराठा संघटनांनी (Maratha organisation) व्‍यूहरचना करण्‍यास सुरुवात केली आहे. संभाजीराजे यांना अपक्ष म्हणून पाठिंबा देण्यास नकार दिल्याचा सेनेला राजकीय फटका बसेल, असे हे समर्थक सांगत आहेत. मराठा समाज सेनेच्या विरोधात जाऊ शकतो, अशी मांडणी हे कार्यकर्ते करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com