Government energy saving scheme in India  Sarkarnama
देश

Government Energy Saving Scheme : वीज, पेट्रोल-डीझेलच्या टेन्शनमधून कायमची मुक्ती! 'हा' एकच उपाय तुम्हाला करणार फ्री; पाहा काय आहे सरकारची योजना...

Government energy saving scheme in India : सरकारच्या नव्या ऊर्जा बचत योजनेमुळे वीज आणि पेट्रोल-डीझेल खर्च कमी करण्याची मोठी संधी. जाणून घ्या ही योजना नेमकी काय आहे आणि सामान्य नागरिकांना कसा होणार फायदा.

Rashmi Mane

मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावामुळे सध्या जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे. होर्मुज सामुद्रधुनीतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये इंधन संकटाची भीती निर्माण झाली आहे. भारतातही पेट्रोल-डीझेलच्या दरवाढीची शक्यता वाढली असून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर इंधन वाढीचा मोठा परिणाम होत आहे. तसेच प्रचंड उकाड्यामुळे विजेची मागणीही विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे वीजबिलाचाही अतिरिक्त ताण सर्वसामान्यांच्या खिशावर पडत आहे.

या परिस्थितीत केंद्र सरकारने पीएम सूर्य घर मोफत वीज योजना नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी योजना ठरत आहे. या योजनेच्या माध्यमातून घराच्या छतावर सोलार पॅनल बसवून मोफत वीज निर्माण करता येते. यामुळे महिन्याला येणारे वीजबिल जवळपास शून्यावर आणणे शक्य होत आहे. त्यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सौरऊर्जा वापरून इलेक्ट्रिक वाहन चार्ज केल्यास पेट्रोल- डीझेलवरील खर्चही कायमचा कमी होऊ शकतो. त्यामुळे ही योजना वीज, पेट्रोल-डीझेलच्या टेन्शनमधून कायमची मुक्ती देणारी ठरणार आहे.

इंधनाच्या टंचाईमुळे सध्या अनेक नागरिक इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक कारकडे वळत आहेत. जर घरात सोलार सिस्टम बसवली तर वाहन चार्ज करण्यासाठी वेगळी वीज खरेदी करण्याची गरज राहत नाही. त्यामुळे इंधनाचे दर वाढले तरी तुमच्या वाहनाचा खर्च नियंत्रणात राहू शकतो.

सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबासाठी 3 kW क्षमतेची सोलर सिस्टम सर्वात उपयुक्त मानली जाते. ही प्रणाली दरमहा सुमारे 300 ते 360 युनिट वीज निर्माण करू शकते. घरातील पंखे, फ्रिज, वॉशिंग मशीन, पाण्याची मोटर आणि AC सहज चालू शकतात. तसेच इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करण्यासाठीही ही क्षमता पुरेशी ठरते. सरकारकडून या सिस्टमसाठी तब्बल 78,000 पर्यंत अनुदान दिले जाते.

मोठ्या कुटुंबांसाठी किंवा इलेक्ट्रिक कार वापरणाऱ्यांसाठी 4 kW ते 5 kW सोलर सिस्टम अधिक फायदेशीर ठरते. ही प्रणाली दरमहा 600 युनिटपर्यंत वीज तयार करू शकते. घरातील अनेक AC, मोठी उपकरणे आणि इलेक्ट्रिक कार चार्जिंग सहज पार पडते.

3 kW सोलर सिस्टम बसवण्यासाठी साधारण 1,60,000 ते ₹1,80,000 इतका खर्च येतो. मात्र सरकारी सबसिडीनंतर प्रत्यक्ष खर्च 82,000 ते 1,00,000 पर्यंत कमी होतो. वीजबिल आणि इंधन खर्चात दरमहा होणारी बचत पाहता हा खर्च 3 ते 4 वर्षांत भरून निघू शकतो. त्यानंतर पुढील 20 वर्षांपेक्षा अधिक काळ मोफत वीजेचा लाभ मिळू शकतो.

या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. नागरिकांनी राष्ट्रीय पोर्टलवर जाऊन नोंदणी करायची आहे. त्यानंतर अधिकृत विक्रेत्याकडून सोलर पॅनल बसवून नेट मीटरिंग प्रक्रिया पूर्ण केली जाते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारकडून अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT