Maharashtra Government Employees: राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! DA थकबाकी मेच्या पगारासोबत मिळणार

Maharashtra DA Arrears:महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी मे 2026 च्या वेतनासोबत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य कर्मचाऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे
Maharashtra Employees DA Hike
Maharashtra Employees DA HikeSarkarnama
Published on
Updated on

 DA Hike News,: राज्यातील शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 1नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याची (DA) थकबाकी मे 2026 च्या वेतनासोबत रोखीने देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 18 मे 2026 रोजी याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. या निर्णयानुसार, सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी थेट वेतनासोबत अदा केली जाणार आहे.

Maharashtra Employees DA Hike
Maharashtra Employees DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! महागाई भत्त्यात वाढ, 1 जानेवारीपासूनचा फरक मिळणार, सोप्या भाषेत समजून घ्या!

यापूर्वी 25 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार महागाई भत्त्याचा दर 55 टक्क्यांवरून 58 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू करण्यात आली होती. तसेच जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 मध्ये देण्यात आली होती. मात्र नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या उर्वरित कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले होते.

Maharashtra Employees DA Hike
Maharashtra Teacher News: समान काम, समान वेतन! उच्च न्यायालयाचा विषय शिक्षकांना मोठा दिलासा

आता या नव्या शासन निर्णयामुळे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. वाढती महागाई आणि खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

कुणाला मिळणार लाभ

शासनाने स्पष्ट केले आहे की, महागाई भत्ता देण्याची विद्यमान कार्यपद्धती पुढेही कायम राहणार असून संबंधित खर्च कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांच्या मंजूर तरतुदीतून करण्यात येणार आहे. तसेच अनुदानित संस्था आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

  1. महाराष्ट्र सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याच्या (DA) थकबाकीबाबत मोठा दिलासा दिला आहे.

  2. नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील DA थकबाकी मे 2026 च्या पगारासोबत रोखीने दिली जाणार आहे.

  3. सातव्या वेतन आयोगानुसार DA दर 55 टक्क्यांवरून 58 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

  4. या निर्णयाचा लाभ राज्य शासकीय कर्मचारी, अनुदानित संस्था आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

  5. वित्त विभागाने 18 मे 2026 रोजी याबाबतचा शासन निर्णय (GR) जारी केला असून लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com