Rahul Gandhi  sarkarnama
देश

Rahul Gandhi Speech : 'राहुल गांधींचे भाषण ऐकून दुधाची बादली पडली, देशद्रोहाचा गुन्हा...' तरुणाने घेतली न्यायालयात धाव

Rahul Gandhi Controversial Speech Petition Filed:राहुल गांधी यांनी दिल्लीतील नवीन काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाषणात जे वक्तव्य केले त्यावर राहुल गांधी यांनी जन्मठेव तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुकेश याने केली आहे.

Roshan More

Rahul Gandhi Speech : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते यांच्या विरोधात बिहारमधील मुकेश चौधरी नावाच्या व्यक्तीने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राहुल गांधी यांचे भाषण ऐकूण आपल्याला मानसिक धक्का बसला आणि आपल्या हातातील दुधाची बादली पडली त्यामुळे बादलीमधील पाच लीटर वाया गेले अन् आपले 250 रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा मुकेश कुमार यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी दिल्लीतील नवीन काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाषणात जे वक्तव्य केले त्यावर राहुल गांधी यांनी जन्मठेव तसेच त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुकेश याने केली आहे. न्यायालयात या प्रकरणाची 17 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

काँग्रसेच्या नवीन मुख्यलयाचे उद्घाटन कार्यक्रमाता राहुल गांधी यांनी भाषण करताना आरएसएस आणि भाजपने देशातील प्रत्येक संस्था ताब्यात घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसची लढाई फक्त भाजप, आरएसएसशीच नाही तर इंडियन स्टेटशी (भारतीय राज्ययंत्रणा) आहे, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याच्या विरोधात मुकेश चौधरी आहेत.

मुकेश चौधरी याने राहुल गांधी यांच्या इंडियन स्टेटशी लढावे लागेल, या वक्तव्यावर आक्षेप घेत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी रोसडा सिव्हिल कोर्टात राहुल गांधींच्या विरोधात देशद्रोहाची याचिका दाखल केली आहे.

मुकेश कुमार म्हणाला, तो राहुल गांधी यांचे भाषण यूट्यूबवर पाहात होता. राहुल यांनी भारतीय स्टेट विरोधात लढण्याचे वक्तव्य केले. त्यांच्या त्या वक्तव्यामुळे मला त्रास झाला. मी इतका अस्वस्थ झालो की माझ्या हातातील दूधाची बादली खाली पडली अन् 250 रुपयांचे दूध वाया गेले. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे आपल्या भावना दुखावल्याचे मुकेश चौधरी म्हणाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT