Vice President Jagdeep Dhankad : मुंबई : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कायदा मंत्री किरन रिजिजू (Kiran Rijiju) हे कॉलेजियम पद्धतीत बदल करण्याची मागणी करत आहेत. न्यायाधीश निवडीची कॉलेजियम पद्धत जुनी आहे.यावरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. या मागणीला न्यायपालिकेकडून नकार दिला जात आहे.
जगभरातील कोणत्याच देशात न्यायाधीशांची निवड या पद्धतीने होत नाही. त्यामुळे यामध्ये बदल करायला हवा, असा आग्रह मंत्री रिजिजू यांनी धरला आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी याविषयी भाष्य केले आहे. यावर बॉम्बे लॉयर असोसिएशन उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
किरन रिजिजू व उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांना न्यायालयाने मनाई करावी, अशी मागणी बॉम्बे लॉयर असोसिएशनने आपल्या जनहित याचिकेत केली आहे. उच्च न्यायालयात या संघटनेने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर येत्या काही दिवसांत सुनावणी होण्याची शक्यता आहे.
२०२१ पासून आतापर्यंत किती वेळा कॉलेजियमवर टीका करण्यात आली आहे याची माहिती याचिकेत देण्यात आली आहे. न्यायाधीश निवडीच्या कॉलेजियम पद्धतीवर करण्यात आलेल्या टीकेचा तपशील याचिकेत देण्यात आला आहे.
न्यायाधीश निवडीची कॉलेजियम पद्धत पारदर्शक आहे. त्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप नको. कॉलेजियमने न्यायाधीशांची निवड केल्यानंतर त्याची यादी केंद्र सरकारकडे पाठवली जाते. त्यातील एखाद्या नावावर आक्षेप असल्यास सरकारने तसे सांगावे. पण या पद्धतीवरच आक्षेप घेऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.