Dombivli News: डोंबिवलीमध्ये भाजपाचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्यावतीने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी कबड्डी चषक 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.
या कबड्डी स्पर्धेस भाजपचे नेते आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी उपस्थिती लावली होती. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना राणे यांनी ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री अनिल परब यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्यावर टिका केली आहे.
"अनिल परब हा 'मातोश्री'चा कारकून आहे. उद्धव ठाकरेंनाही परबांसारखेच कारकून लागतात, ठाकरे यांच्यात हिम्मत नाही कारण ते नामर्द आहेत," अशी जाहीर टिका आमदार नितेश राणे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
ठाकरे यांच्यावर टीका करताना राणे यांनी जीभ पुन्हा घसरली. परब यांच्याविषयी राणे म्हणाले, "परब याचे घर फक्त झाकी आहे,'मातोश्री' अजून बाकी आहे,"
अनिल परब हा मातोश्रीचा कारकून असून, उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत नाही ककर्ण ते नामर्द आहेत अशी खालच्या पातळीवरील टीका राणे यांनी केली. दुसऱ्या मातोश्री वर हातोडा पडेल तेव्हा त्यांना दिसेल त्याच्यात पण खूप काही अनधिकृत अशा गोष्टी आहेत असे ही ते म्हणाले.
"परब यांनी सुक्या धमक्या देऊ नये, त्यांनी तारीख व वेळ कळवावी, चहा आम्ही त्यांच्यासाठी तयार ठेवू. न्यायालय न्याय देण्याचे काम करेल, आमच्या घरात येऊन कोणी धिंगाणा घालणे इतके सोप्पे नाही. कोणी ही यावे -जावे आमचं घर काय मातोश्री नाही. आम्ही त्यांचे असे स्वागत करू की पुन्हा राणे साहेबांच्या घराच्या जवळ ते फिरकणार नाहीत असा इशारा त्यांनी परब यांना दिला.
"दुसऱ्याच घर पाडण्याच्या तक्रारी देणारे ही लोक, त्यांच्यासोबत नियती कधी ना कधी खेळ करतेच. कधी राणे साहेबांचे, कधी कंगना राणावतचे घर तोडा, कधी दुसऱ्याला अटक करायला लावा हेच यांनी केलं,"असे नितेश राणे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.