Congress MPs controversy Sarkarnama
देश

Lok Sabha update : पंतप्रधान मोदींसह आणखी एक व्यक्ती होती महिला खासदारांच्या टार्गेटवर; केंद्रीय मंत्र्यांकडून धक्कादायक खुलासा

Piyush Goyal Alleges Targeting of PM Modi, Sparks Fresh Political Clash in Parliament : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय मंजूर करण्यात आला आहे. त्यांचे ४ तारखेला सायंकाळी पाच वाजता भाषण होणार होते.

Rajanand More

Lok Sabha controversy : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत ४ फेब्रुवारीला काँग्रेसला महिला खासदारांच्या कृतीवरून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या महिला खासदारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याचा प्लॅन होता, असा धक्कादायक दावा खुद्द लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीच केल्याने खळबळ उडाली होती. हल्ल्याचा प्लॅन आधीच माहिती झाल्याने पंतप्रधानांना येऊ नका असे सांगिल्याचेही बिर्ला म्हणाले होते.

आता बिर्ला यांच्या दाव्यानंतर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनीही धक्कादायक दावा करत खळबळ उडवून दिली आहे. केवळ पंतप्रधान मोदीच नव्हे तर या महिला खासदारांच्या टार्गेवर आणखी एक खासदार होते, असे गोयल म्हणाले आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीही बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय मंजूर करण्यात आला आहे. त्यांचे ४ तारखेला सायंकाळी पाच वाजता भाषण होणार होते. पण काँग्रेसच्या महिला खासदारांच्या कथित हल्ल्याच्या प्लॅनमुळे ते रद्द करावे लागल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यावेळी लोकसभेत उपस्थित असलेल्या गोयल यांनी नेमकं काय घडलं, याची माहिती दिली आहे.

गोयल यांनी सांगितले आहे. मी तिथेच होतो. खूप भीतीदायक दृश्य होते. विरोधी पक्षातील काही खासदारांनी पंतप्रधानांच्या आसनाला सगळीकडून घेरले होते. माहिती नाही, पण आमच्यावर हल्ला करू शकले असते. हे दुर्दैव आहे, त्यांनी माफी मागायला हवी. काही अंतर्गत सुत्रांनुसार एक माहिती समोर आली आहे की, पीएम मोदी तर टार्गेट होतेच पण त्याशिवाय आणखी एक खासदार काँग्रेसच्या महिला खासदारांच्या निशाण्यावर होते. त्यांना इतर खासदारांनी लोकसभेतून जायला सांगितले होते.

कोणते खासदार टार्गेटवर?

न्यूज १८ वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, निशिकांत दुबे महिला खासदारांच्या निशाण्यावर होते. लोकसभेचे कामकाज सायंकाळी पाच वाजता सुरू झाल्यानंतर महिला खासदार अध्यक्षांसमोरील रिकाम्या जागेत जमा झाल्यानंतर काही खासदार पंतप्रधानांच्या आसनाकडे गेल्या. त्यावेळी त्यांची नजर दुबेंवर पडली. त्या खासदार त्यांच्या दिशेने जाऊ लागल्या. त्याचवेळी खासदार अनुराग ठाकूर यांनी दुबेंना इशारा करत बाहेर जाण्यास सांगितले. त्यावरून दोघांमध्ये काही सेकंद संवाद झाल्याचे दिसले.

दुबे यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंसह इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याशी संबंधित काही पुस्तकांचा लोकसभेत संदर्भ देत अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल होता. त्यावरून काँग्रेसच्या खासदारांमध्ये प्रचंड नाराजी होती. त्यामुळे काँग्रेस खासदारांच्या निशाण्यावर दुबे होते, अशी चर्चा आहे. काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी यांनी मात्र यापूर्वीच सर्व दावे फेटाळून लावले आहेत. महिला खासदार केवळ बॅनर दाखवून विरोध प्रदर्शन करत होत्या. इतर कोणताही प्लॅन नव्हता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT