PM Kisan 24th Installment Sarkarnama
देश

PM Kisan Update : शेतकऱ्यांना दिवाळीचे मोठे गिफ्ट! 'याच' महिन्यात खात्यात जमा होणार 'पीएम किसान'चा 24 वा हप्ता!

PM Kisan 24th Installment : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याबाबत महत्त्वाचे अपडेट जाणून घ्या. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार आणि लाभार्थी यादी कशी तपासायची?

Rashmi Mane

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 24 व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. सरकारने पीएम किसान सन्मान निधीच्या 24 व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख जाहीर केली आहे.

सरकारने म्हटले आहे की, पीएम किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर रोजी वितरित केला जाईल. यापूर्वी, हा हप्ता नवरात्रीमध्ये वितरित होण्याची अपेक्षा होती. मात्र, आता पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना वितरित केला जाईल.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 2000 रुपयांचा हप्ता

पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी 2000 रुपयांचे हप्ते वितरित केले जातात. किसान सन्मान निधीचा 23 वा हप्ता जूनमध्ये वितरित करण्यात आला होता. आता, 24 वा हप्ता 30 ऑक्टोबर म्हणजे दिवाळीआधी वितरित केला जाईल.

2000 थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील.

सरकार डीबीटी (DBT) द्वारे 2000 चा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (eKYC) अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे बायोमेट्रिक किंवा ओटीपी-आधारित ई-केवायसी पूर्ण केलेले नाही, त्यांना पेमेंट मिळण्यास विलंब होऊ शकतो.

याव्यतिरिक्त, योजनेच्या लाभांचा फायदा घेण्यासाठी, त्यांचे बँक खाते आणि आधार लिंक केलेले असणे, तसेच थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्रिय केलेले असणे आवश्यक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT