LPG gas and petrol latest political update: परदेश दौऱ्यावरून भारतात परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने मंत्रिपरिषदेची महत्त्वाची बैठक बोलावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.
गुरुवारी सायंकाळी 4 वाजता नवी दिल्लीतील ‘सेवा तीर्थ’ येथे होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे जवळपास 1 वर्षानंतर सर्व केंद्रीय मंत्री, स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि इतर राज्यमंत्री एकत्रितपणे या बैठकीत सहभागी होणार आहेत.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस आणि इतर अत्यावश्यक वस्तूंच्या किमतींबाबत सरकार काही मोठे निर्णय घेऊ शकते, अशी चर्चा सुरूआहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन नागरिकांना कमी त्रास होईल, यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजनांवर विचार करू शकते.
बैठकीत ऊर्जा, कृषी, खत, विमान वाहतूक, जहाजरानी आणि लॉजिस्टिक्स विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अलीकडील सरकारी निर्णयांचे परिणाम, विविध योजनांची अंमलबजावणी आणि आगामी धोरणांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी काही महत्त्वाचे निर्देश दिले जाऊ शकतात.
दरम्यान, मोदी सरकार 3.0 मध्ये संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांमुळे या बैठकीचे महत्त्व आणखी वाढले आहे. जून 2024 मध्ये तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या दुसऱ्या वर्षपूर्तीपूर्वी प्रशासनाची कामगिरी, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि कल्याणकारी योजनांचा सखोल आढावा घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
या बैठकीनंतर सरकार इंधन दर, एलपीजी पुरवठा किंवा सामान्य जनतेला दिलासा देणाऱ्या काही नव्या घोषणा करते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.