MLC Election : नाशिक विधानपरिषदेत महायुतीला कडवी टक्कर देण्यासाठी 'मविआ'ची तयारी ; इस्लाम, समाजवादी पार्टीला सोबत घेण्याच्या हालचाली

Nashik MLC Election : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत एकुण पक्षीय बलाबल पाहाता महायुतीकडे बहुमत आहे. मात्र महायुतीविरोधात लढण्यासाठी मविआकडून MIM, इस्लाम, समाजवादी पार्टीला सोबत घेऊन मोट बांधण्याची तयारी केली जात आहे.
Sharad Pawar, Uddhav thackeray
Sharad Pawar, uddhav thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. १८ जूनला मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता राजकीय हालचाली देखील अधिक गतिमान झाल्या आहेत. महायुती व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी तयारी सुरु केली आहे.

नाशिक विधानपरिषद निवडणुकीत एकुण पक्षीय बलाचा विचार केल्यास महायुतीचे पारडे अधिक जड आहे. परंतु महाविकास आघाडीकडे सध्या संख्याबळ कमी असले तरी निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला आहे. महाविकास आघाडी या निवडणुकीत ताकदीने उतरणार असून सगळे मिळून एकच उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहे.

एकीकडे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी प्रत्येक पक्षात दावेदार दिसत असताना आता महाविकास आघाडीकडून मात्र, सर्व मिळून एकच उमेदवार देण्याची तयारी केली जात आहे. शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष व काँग्रेस यांच्यात निवडणूक लढवण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. महायुतीच्या उमेदवाराला सहजासहजी विजय मिळू द्यायचा नाही, यावर तिन्ही पक्षांचे सध्या एकमत झाले आहे.

विशेष म्हणजे महाविकास आघाडी आपल्यासोबत इस्लाम, समाजवादी पार्टी आणि एमआयएम सारख्या सर्व महायुतीच्या विरोधातील पक्षांची मोट बांधण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. सर्व पक्षीयांची एकत्रित बैठक बोलवण्याचे देखील नियोजन केले जात आहे.

Sharad Pawar, Uddhav thackeray
Nashik Crime : जमीन बळकावली अन् 90 लाखांची खंडणी, राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक अडचणीत, पोलिसांनी घेतली मोठी अ‍ॅक्शन

महायुतीकडून अनेकजण इच्छुक असून आपली दावेदार सांगत आहेत. त्यात विशेषत : गतवेळचे आमदार नरेंद्र दराडे हे सध्या शिंदे शिवसेनेकडू उमेदवारी करण्यास इच्छूक आहेत. त्यांची त्यादृष्टीने तयारी देखील सुरु आहे. त्याचवेळी त्यांच्याच पक्षातील आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजूम कांदे, भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते, विजय करंजकर ही नावे देखील चर्चेत आहेत.

तर भाजपकडून स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांचे नाव चर्चेत आहे. आता भाजपमधील इच्छुकांची इतरही काही नावे पुढे येऊ लागली आहेत. त्यामुळे महायुती आता महायुती म्हणूनच लढणार की वेगवेगळे हे पाहण्याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. महायुतीकडून एक उमेदवार दिला जाण्याची शक्यता अधिक आहे.

Sharad Pawar, Uddhav thackeray
Nashik MLC Election : छगन भुजबळांची भूमिका ठरणार निर्णायक; शिवसेनेकडून दराडे उमेदवार राहिल्यास भाजपचं पारडं पडेल जड

असे असताना महाविकास आघाडीने मात्र सगळे मिळून एक उमेदवार देण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे. त्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षाकडून आपले समविचारी पक्ष तसेच इतकेच नव्हे तर इस्लाम, एमआयएम, समाजवादी पार्टी या पक्षांनादेखील बरोबर घेण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे संख्याबळ कमी असलं तरी महाविकासआघाडी पूर्ण ताकदीने उतरणार हे स्पष्ट आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com