Prime Minister Narendra Modi announces increased MSP for 14 Kharif crops Sarkarnama
देश

MSP Hike for Kharif Crops : केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ; शेतकऱ्यांची दिवाळी!

Union Government MSP Hike for 14 Kharif Crops : केंद्र सरकारने १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Aslam Shanedivan

  1. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2026-27 हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

  2. नागपूर विमानतळाच्या आधुनिकीकरण प्रकल्पाला देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

  3. शेतकरी, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रासाठी घेतलेल्या या निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

Navi Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. तसेच याच बैठकीत पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रासाठी देखील महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली असून यात नागपूर विमानतळासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मोदी सरकारने २०२६-२७ च्या हंगामासाठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बुधवारी (13 मे) झाली. यावेळी सरकारने १४ खरीप पिकांच्या MSP वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार सर्वाधिक वाढ सुर्यफूल बियांत करण्यात आली असून ती ६२२ रूपये इतकी आहे. तसेच केंद्राने तांदळासाठी MSP २४४१ निश्चित करण्यात आला आहे, जो मागील MSP च्या २३६९ च्या तुलनेत ७२ रुपयांनी जास्त आहे. तर सामान्य आणि ग्रेड एमध्ये २० रूपयांचा फरक असून तो ग्रेड ए २४६१ निश्चित करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री वैष्णव यांच्या माहिती नुसार, ज्वारी (संकरित) ४०२३ निश्चित करण्यात आला असून तब्बल ३२४ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच मालदांडी ज्वारीसाठीही ३२४ रूपयाची वाढ केली गेली आहे. बाजरीच्या MSP त १२५ रूपयांची वाढ करण्यात आली असून ती आता २९०० शे झाली आहे. डाळीत तुरीचा MSP ४५० रुपयांनी वाढवण्यात आला असून तो आता ८४५० रू निश्चित झाला आहे. तर तेलबियात शेंगदाणाचा MSP २५४ रूपये, सुर्यफूल-६२२, सोयाबीन (पिवळे)- ३८०, तीळ-५०० नायजरसीड- ५१५ रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर कापसाबद्दलही केंद्राने ५५७ रूपयांची MSPत वाढ केली आहे.

दरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी सरकारने खरीप पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे या हंगामात शेतकऱ्यांना एकूण २ लाख ६० हजार कोटी रुपयांचे वाटप होण्याचा अंदाज असून सुमारे ८२४ लाख मेट्रिक टन पिकांची खरेदी सरकार करेल.

मंत्रिमंडळातील अन्य निर्णय...

मुदत वाढवण्यास मंजुरी

नागपूर विमानतळावरील 'मिहान इंडिया लिमिटेड'ला (MIL) देण्यात आलेल्या जमिनीच्या भाडेपट्ट्याची मुदत वाढवण्यात आली आहे. जी 6 ऑगस्ट 2039 नंतरही पुढे सुरू राहील. तर नागपूर विमानतळाचे आधुनिकीकरणास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

कोळसा प्रकल्पांना मंजुरी

ऊर्जा क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी ३७,५०० कोटी रुपयांच्या 'सर्फेस कोल आणि लिग्नाइट गॅसिफिकेशन' योजनेला मंजुरी देण्यात आली असून 2030 पर्यंत १० कोटी टन कोळशाचे वायूमध्ये रूपांतर करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट होईल आणि आयातीवरील आपले अवलंबित्व कमी होईल.

'सेमी-हाय-स्पीड' रेल्वे

रेल्वे मंत्रालयाच्या 'अहमदाबाद (सरखेज)–धोलेरा सेमी-हाय-स्पीड दुहेरी मार्ग प्रकल्पा'ला मंजुरी देण्यात आली असून या संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे 20 हजार 667 कोटी खर्च अपेक्षित आहे. जो भारतीय रेल्वेचा हा पहिलाच 'सेमी-हाय-स्पीड' प्रकल्प आहे. या प्रकल्पात स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

FAQs :

1. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला?

2026-27 हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

2. MSP म्हणजे काय?

MSP म्हणजे किमान आधारभूत किंमत, जी सरकार शेतमालासाठी हमीभाव म्हणून जाहीर करते.

3. नागपूर विमानतळाबाबत काय निर्णय घेण्यात आला?

नागपूर विमानतळाच्या आधुनिकीकरण प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.

4. या निर्णयांची माहिती कोणी दिली?

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयांची माहिती दिली.

5. या निर्णयांचा फायदा कोणाला होणार आहे?

देशातील शेतकरी, प्रवासी आणि पायाभूत सुविधा क्षेत्राला या निर्णयांचा फायदा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT