Abhijeet Dipke, Narendra Modi Sarkarnama
देश

Abhijeet Dipke : PM मोदी लाल किल्ल्यावरील भाषणात सर्वात कळीचा मुद्दा बोलणार? CJP ने दिलं उघड चॅलेंज, GenZ ला सांगितला सगळा प्लॅन

Abhijeet Dipke on PM Modi's Independence Day Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी (ता.६) त्यांनी राष्ट्रीय हातमाग दिनाच्या पूर्वसंध्येला आणखी एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामधून त्यांनी स्वदेशी आंदोलनाची आठवण करून दिली. नागरिकांनी हातमाग उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असं आवाहन केलं आहे.

Jagdish Patil

PM Modi Independence Day speech : जंतरमंतरवर झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनापासू पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय झाले आहेत. ते इन्स्टाग्रामवर सतत नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतात. गुरूवारी (ता.६) त्यांनी राष्ट्रीय हातमाग दिनाच्या पूर्वसंध्येला आणखी एक व्हिडिओ शेअर केला.

ज्यामधून त्यांनी स्वदेशी आंदोलनाची आठवण करून दिली. नागरिकांनी हातमाग उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असं आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी या व्हिडिओ शेअर केल्यानंतर लगेचच कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिपके यांनी येत्या १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणातून देशातील तरुण पिढीला संबोधित करावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केंद्र सरकार कोणती ठोस पावले उचलत आहे, याची माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे.

दीपके आपल्या व्हिडिओत म्हणाले, "१५ ऑगस्ट येत आहे. प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला आपले पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भाषण करतात. यावेळी आमची इच्छा आहे की पंतप्रधान मोदी यांचं हे भाषण जेन-झी आणि युवांसाठी असावं. त्यांनी आपल्या १५ ऑगस्टच्या भाषणातून सांगावं की, ते जेन झीसाठी काय करत आहेत.

तसंच जेन-झीच्या उज्वल भविष्यासाठी सरकारकडून नक्की काय उपाययोजना केल्या जात आहेत, हे स्पष्टपणे सांगावे. शिवाय तुम्ही सर्वांनी पुढील आठवडाभर पंतप्रधानांना अशी विनंती करा की, यावेळीचं त्यांचं भाषण हे जेन झीसाठी आणि युथसाठी असावं.", अशी मागणी दीपके यांनी आपल्या व्हिडिओतून केली आहे.

त्यामुळे आता यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदी जेन झी बाबत बोलणार का? याकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, अभिजित दीपके यांनी त्यांच्या कालच्या पत्रकार परिषदेत सेजेपीकडून ‘क्या बोलती पब्लिक’ ही मोहीम येत्या सप्टेंबर महिन्यापासून महाराष्ट्र आणि देशभरात राबवली जाणार असल्याची घोषणा केली आहे. विद्यार्थी, तरुण आणि सामान्य नागरिकांचे दैनंदिन प्रश्न थेट प्रशासनापर्यंत पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT