Shivena Politics : शिवसेना सुनावणीदरम्यान मोठी घडामोड : ठाकरेंचा सर्वात विश्वासू नेता उदय सामंतांच्या भेटीला : हॉटेलमधील फोटो समोर

Milind Narvekar and Uday Samant Meeting : कोल्हापूरातील सयाजी हॉटेलमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विविध पक्षांतील नेत्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे आमदार अमोल महाडिक आणि विवेक कोल्हे, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम तसेच बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनीही सामंत यांची भेट घेतली.
Milind Narvekar | Uday Samant Meeting | Shiv Sena Politics
Milind Narvekar | Uday Samant Meeting | Shiv Sena PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 07 Aug : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच राज्याच्या राजकारणात एका अनपेक्षित भेटीची चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार मिलिंद नार्वेकर यांनी कोल्हापुरात राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) नेते उदय सामंत यांची भेट घेतली. या भेटीमुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (६ ऑगस्ट) कोल्हापूरातील सयाजी हॉटेलमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विविध पक्षांतील नेत्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे आमदार अमोल महाडिक आणि विवेक कोल्हे, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम तसेच बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनीही सामंत यांची भेट घेतली.

याचदरम्यान उदय सामंत आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात स्वतंत्र बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Milind Narvekar | Uday Samant Meeting | Shiv Sena Politics
Shivsena: ठाकरेंच्या वकिलांना फुल्ल कॉन्फिडन्स! सांगितलं शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' पक्षचिन्हाच्या वादाचा निकाल कधी लागणार...

मात्र, उदय सामंत, मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या भेटीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, एकीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सुरू असून, ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल जोरदार युक्तिवाद करत आहेत.

Milind Narvekar | Uday Samant Meeting | Shiv Sena Politics
Satara DCC Bank : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून शिवेंद्रराजे, उदयनराजे, रामराजेंसह 10 दिग्गज आऊट : गोरे, शंभूराज, मकरंदआबा, बाळासाहेब पाटलांना संधी

दुसरीकडे, खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला भविष्यात भाजप किंवा प्रहार जनशक्ती पक्षात विलीन व्हावे लागू शकते, असा दावा केला आहे. अशा राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे विश्वासू मानले जाणारे मिलिंद नार्वेकर आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांची झालेली भेट विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com