Modi`s interview to ANI sarkarnama
देश

UP निकालाचा भाजपला धसका? तब्बल अडीच वर्षांनंतर मोदींनी प्रश्नांना उत्तरे दिलीत!

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पत्रकारांच्या प्रश्नांना क्वचितच उत्तर देतात, असा लौकीक आहे.

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पत्रकारांना किंवा माध्यमांशी थेट बोलत नाहीत. ट्विटर किंवा फेसबुक द्वारे ते थेट जनतेशी संवाद साधतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळीच ते पत्रकारांना मुलाखती देत असल्याचे 2014 ते 2019 दरम्यान दिसले होते. आता मात्र उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांत निवडणुकीचा प्रचार जोरात असताना मोदी यांनी ANI ला मुलाखत दिली आहे. उत्तर प्रदेश जिंकणे भाजपसाठी महत्वाचे आहे. येथे अखिलेश यादव यांनी भाजपला मोठे आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. येथील निवडणुकीचा निकाल भाजपच्या विरोधात जाऊ नये म्हणून तर आता मोदींनी मुलाखत दिली नाही ना, असा प्रश्न विचारला जात आहे.

मोदी यांची पंतप्रधान म्हणून शेवटची मुलाखत ही 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या मतदानाच्या टप्प्याच्या वेळी झाली होती. त्यानंतर आता 2022 पर्यंत त्यांनी भारतातील पत्रकारांना राजकीय परिस्थितीविषयी मुलाखत देण्याचे टाळले. या वेळी मात्र त्यांनी आपला हा नियम बदलला आहे.

त्यांनी उत्तर प्रदेश, गोवा आणि पंजाबमध्ये भाजपची येणार असल्याचा दावा केला. त्यांनी अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला. अखिलेश यादव हे उद्धट असल्याचा आरोप करत ते इतके उद्धट आहेत की, त्यांनी याआधी 'गुजरात के दो गधे' असा उल्लेख केला होता. त्यानंतर यूपीने त्यांना धडा शिकवला आहे. आणखी एकेवेळी त्यांच्यासोबत 'दोन मुले आणि एक बुवाजी' त्यांच्यासोबत होत्या. मात्र, तरीही काही गणित जमलं नाही, अशी टीका मोदींनी अखिलेश यांच्यावर केली.

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारच्या कामगिरीचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले. या निवडणुकीत मोदी सरकारच्या कामगिरीचेही मूल्यमापन होणार का, या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर दिले नाही. पण भाजप गरिबांसाठी काम करत राहणार असल्याचा दावा त्यांनी केला. येथील विजयाचे श्रेय तुम्हाला दिले जाईल पण पराभव झाला तर त्यालाही तुम्ही जबाबदार असाल का, या प्रश्नावर पराभवाने खचून जाणारा आमचा पक्ष नाही. आम्हाला पराभव सहन करूनच येथपर्यंत पोहोचता आले. मात्र सरकारच्या कामगिरीमुळे पराभव होण्याची शक्यताच नसल्याचा दावा त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT