PM Modi Independence Day speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला. त्यानंतर त्यांनी देशाला संबोधित केलं.
यावेळी त्यांनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प दृढ केल्याचं सांगत सिंधू जल करारावरून पाकिस्तानला खडे बोल सुनावले. लाल किल्ल्यावरील भाषणातून त्यांनी विविध विषयांवर भाष्य करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा उल्लेख करत संघाचं तोंडभरून कौतुक केलं.
पंतप्रधान मोदी म्हणाले, आज मी अभिमानाने सांगतो की 100 वर्षांपूर्वी आरएसएसचा जन्म झाला. हा राष्ट्रसेवेचा 100 वर्षांचा एक गौरवशाली आणि सुवर्ण अध्याय आहे. सेवा, समर्पण, संघटन आणि शिस्त ही आरएसएसची ओळख आहे.
तसंच राष्ट्रनिर्माणाच्या या संकल्पनेसह स्वयंसेवकांनी मातृभूमीच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित केले. एक प्रकारे आरएसएस ही जगातील सर्वात मोठी एनजीओ आहे. संघाचा 100 वर्षांचा त्यागाचा इतिहास आहे, असं मोदी म्हणाले.
मोदींनी थेट लाल किल्ल्यावरून संघाचं कौतुक केल्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी दिली. ती म्हणजे आजपासूनच त्यांनी देशातील तरुणांसाठी 1 लाख कोटी रुपयांची योजना राबवली जाणार असल्याचं सांगितलं.
पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना आजपासून सुरू होत असून तुमच्यासाठी ही एक मोठी आनंदाची बातमी असल्याचं मोदी म्हणाले. तर या योजनेअंतर्गत, खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सरकारकडून 15 हजार रुपये दिले जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.