NCP Politics : सुरज चव्हाणांना नियुक्तीचं पत्र तटकरेंनी दिलं, पण 'तो' निर्णय अजित पवारांना न विचारता? दादांच्या 'त्या' वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

Suraj Chavan Promotion : राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना बेदम मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रमोशन करण्यात आलं आहे.
Ajit Pawar On NCP leader Suraj Chavan’s appointment
NCP leaders announce Suraj Chavan’s appointment as General Secretary during a formal event, sparking political backlash over the Chhava protest assault case.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 15 Aug : राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना बेदम मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रमोशन करण्यात आलं आहे.

त्यांच्यावर आता राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सूरज चव्हाण यांची सरचिटणीसपदी नियुक्ती केल्यामुळे विरोधकांकडून टीका केली जात आहे. कारण छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूरज चव्हाणांची तातडीने युवक प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते.

मात्र, या घटनेला महिनाही व्हायच्या आधीच सूरज चव्हाण यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सूरज चव्हाण यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी मंत्री छगन भुजबळ, आदिती तटकरे यांच्यासह पक्षाचे इतर आमदार आणि नेते उपस्थित होते.

Ajit Pawar On NCP leader Suraj Chavan’s appointment
Sanjay Raut Sangamner : 'महाराष्ट्रात बदलाची प्रक्रिया, 'मविआ'चे सरकार येणार'; खासदार राऊतांनी थोरातांविषयी बोलून दाखवली 'ती' खंत

मात्र, चव्हाण यांना पक्षात बढती दिल्याची आपणाला काहीच माहिती नसल्याचं अजब वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. सूरज चव्हाण यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केल्या संदर्भात अजित पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "मला त्याबाबतची माहिती नाही. मी त्या बैठकीला नव्हतो. मी त्याबद्दलची माहिती घेतो. मला त्यावेळेस जे खटकलं, मी तेव्हा निर्णय घेतला. ज्या गोष्टी मला खटकतात, त्याबाबत मी तडकाफडकी निर्णय घेतो."

Ajit Pawar On NCP leader Suraj Chavan’s appointment
Nitesh Rane : 'आगामी आमदार भाजपचाच', दादांच्या आमदाराच्या होम ग्राउंडवर नितेश राणेंची घोषणा; स्थानिकबाबतही स्वबळाचा नारा

छावा संघटनेचा इशारा

मात्र, पक्षाचे सर्वेसर्वा असलेले अजितदादांना न विचारता पक्षाच्या सरचिटणीसपदी एखाद्या व्यक्तीची कशी नियुक्ती केली जाऊ शकते? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आमच्या जखमा ओल्या असतानाच सूरज चव्हाणला हे पद दिलं. त्यामुळे याचे परिणाम सुनील तटकरे यांनी येणाऱ्या काळात भोगावे लागतील असा इशारा छावा संघटनेने दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com