Bengaluru : 'चांद्रयान-3' मोहिमेच्या यशाबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली, त्यांचे अभिनंदन, कौतुक करीत त्यांच्या मोहीमेला सलाम केला. इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी मोदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी मोदींनी त्यांनी त्यांच्या पाठीवर थाप देऊन त्यांनी मिठी मारली. उपस्थितांनी या हा क्षण टाळ्या वाजून साजरा केला.
मोदी यांनी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. मोदी आज पहाटे साडेपाच वाजताच बेंगळुरु एचएएल विमानतळावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी इस्रोच्या मुख्यालयाला भेट दिली. "तुमचं कितीही कौतुक केलं तरीच कमीच" असे सांगतानाच त्यांना अश्रू अनावर झाले.
'चांद्रयान-3' लॅण्ड झालेले जागेला मोदींनी 'शिवशक्ती'असे नाव दिले. तर चांद्रयान-२ उतरलेल्या जागेला 'तिरंगा'हे नाव दिले आहे.
मोदी म्हणाले, "'चांद्रयान-3 लॅण्ड झाले तेव्हा मी दक्षिण आफ्रिकेत होतो, त्यानंतर ग्रीसमध्ये कार्यक्रमाला गेलो होतो. पण माझे मन पूर्णपणे तुमच्यात गुंतले होते. मला कधी असे वाटते की, मी तुमच्यावर अन्याय करतोय. माझी उत्सुकता आणि तुम्हाला त्रास. सकाळी-सकाळी मला तुमच्यासमोर नतमस्तक व्हायचे होते. तुम्हाला लवकर तुम्हाला भेटायचं होते," "तुमच्या मेहनतीला सलाम, तुमच्या संयमाला सलाम, तुमच्या जिद्दीला सलाम, तुमच्या चैतन्यला सलाम,"असे मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले, " "आता भारत चंद्रावर आहे, चंद्रावर आपला राष्ट्रीय अभिमान असून ज्या ठिकाणी कोणी गेले नव्हते तिथे आपण गेलो आहोत. आपण ते केले जे यापूर्वी कोणी केले नव्हते. हा आजचा भारत, निर्भय भारत, लढणारा भारत आहे. नव्या पद्धतीने विचार करणारा हा भारत आहे. जो डार्क झोनमध्ये जाऊनही जगात प्रकाशकिरण पसरवतो,"
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.