Narendra Modi, Heeraben Modi
Narendra Modi, Heeraben Modi Sarkarnama
देश

PM Modi's Mother Health: पंतप्रधानांच्या मातोश्री रुग्णालयात दाखल, राहुल गांधींचे ट्विट व्हायरल!

सरकारनामा ब्यूरो

PM Modi's Mother Health : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची आई हीराबेन यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना सध्या अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काल रात्री त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे.

यूएन मेहता रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात यूएन मेहता रुग्णालयात पोहोचणार आहे, अशी माहिती मिळत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजपचे (BJP) अनेक आमदार रुग्णालयात उपस्थित आहेत. दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की "आई आणि मुलामधील प्रेम हे शाश्वत आणि अमूल्य आहे. मोदीजी, या कठीण काळात माझे प्रेम आणि पाठिंबा तुमच्यासोबत आहे. मला आशा आहे की तुमची आई लवकर बरी होईल." तसेच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही रुग्णालयात दाखल असलेल्या हीराबेन या लवकरात लवकर त्यांची प्रकृती सुधारावी, असे म्हटले आहे.

हीराबेन यांच्या तब्येतीत सुधारणा

हीराबेन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे यूएन मेहता रुग्णालयाचे संचालक आर के पटेल यांनी एका हेल्थ बुलेटिनमध्ये सांगितले. हीराबेन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत, असल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT