Woman Accuses to Rahul Shewale : शेवाळेंचेच पाकिस्तान, कराची कनेक्शन; व्हिडीओतून महिलेचे धक्कादायक खुलासे

ठाकरे गटाने शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या एका फॅशन डिझायनरचे शोषण केल्याचा आरोप केला होता.
Women Allegation to Rahul Shewale
Women Allegation to Rahul Shewale

Rahul Shewale News Update : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाने शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या एका फॅशन डिझायनरचे शोषण केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. असे असतानाच दूसरीकडे राहुल शेवाळे यांनी संबंधित महिलेचे महिलेचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानमधील गँगशी संबंध असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट केला होता. इतकेच नव्हे तर या प्रकरणाची एनआयए मार्फत चौकशी करण्याची मागणीही शेवाळे यांनी केली. त्यामुळे हे प्रकरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

त्यानंतर आता संबंधित फॅशन डिझायनर महिलने समोर येत राहुल शेवाळे यांचे आरोप फेटाळून शेवाळे यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. ट्विटवर व्हिडीओ शेअर करत तिने धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. ''खासदार राहुल शेवाळे यांनी माझ्यावर जे आरोप केले आहेत ते बिनबुडाचे आहेत. त्यांनी माझे संबंध पाकिस्तान गॅंग, दाऊदशी असल्याचे आरोप केले पण ते सर्व खोटे असून ते मला बदनाम करत आहेत. त्यांनी माझ्यावर मानसिक आणि शारिरीक अत्याचार केले. माझ्याविरोधात खोट्या केसेस दाखल केल्या.

Women Allegation to Rahul Shewale
OBC Reservation : मोठी बातमी ; ओबीसी आरक्षणशिवाय नगरपालिका निवडणुका ; न्यायालयानं सांगितलं,..

शेवाळे यांच्याविरोधात मी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण त्यांच्या राजकीय शक्तीमुळे माझी तक्रार लिहून घेण्यात आली नाही. त्यांनी मला आणि माझ्या कुटूंबियांनाही जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. माझ्याच विरोधात खोट्या केसेस दाखल केल्या. याचवेळी महिलेने खासदार शेवाळे आणि आपल्यातील संबंधांवरही भाष्य केलं आहे. " खासदार राहुल शेवाळे यांनी मला लग्नाचं वचन दिलं होतं. आमचे दोन वर्षे कमिटेड रिलेशनशिपमध्ये होतो. अनेकदा त्यांनी दारु पिऊन माझ्यावर शारिरीक आणि मानसिक अत्याचार केले, धमक्या दिल्या. लग्नाचं विचारल्यावर त्यांनी मला आणि माझ्या कुटूंबियांना धमक्या दिल्या.

दाऊद गॅंगशी संबंध असल्याच्या आरोपावरही महिलेने खुलासा केला आहे. '' माझे फॅशन डिझायनिंगचे शिक्षण दुबईत झाले आहे. तिथे माझी कंपनीसुद्धा होती. तिथे माझे सगळ्या देशातील मित्र मैत्रिणी, सहकारी आहेत. त्यामुळेच त्यांनी माझे दाऊदशी संबंध असल्याचे बिनबुडाचे आरोप करत आहेत. माझं काहीही कनेक्शन असेल, तर मी एनआयएला विनंती करते, की तुम्ही कधीही माझे कॉल रेकॉर्ड, माझा पासपोर्ट चेक करा. मी देशातल्या प्रत्येक व्यक्तीला एक एक कॉपी पाठवते. त्याचं म्हणणं आहे की, मी दोन वेळा कराचीला गेले आहे. माझा पासपोर्ट चेक करा. मी दुबईतही तक्रार केली, तर तिथेही त्याने मला अटक करायला लावली. मी ७८ दिवस जेलमध्ये होते, आता सुटून आले, तर इथेही तो मला त्रास देत आहे. असा आरोप महिलेने केला आहे.

राहुल शेवाळे मला दुबईत भेटायला यायचे.पण त्यानंतर ते कुठे जात होते. ते कितीदा पाकिस्तान, कराचीला गेले त्यांचेही पासपोर्ट चेक करा. त्यांची संपत्ती किती आहेत. तिथे त्यांचे काय काय बिझनेस आहेत त्याचाही तपास करा. त्यांचे कोणत्या लेव्हलचे दुबईचे कनेक्शन आहेत, हाही तपास करा, अशी मागणीही महिलेने केली आहे. इतकेच नव्हे तर, त्याने तिथल्या सुनावणीचे न्यायालयातले, तुरुंगातले फोटोही घेतले आहेत. त्यामुळे त्याचंही कनेक्शन चेक करा, असंही महिलेने म्हटलं आहे. तसेच, मी भारताची मुलगी आहे. पण ते मलाच नव्हे तर भारतालाही बदनाम करत आहेत. मला न्याय हवा आहे. माझा या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, मी हात जोडून विनंती करते, मला न्याय हवा आहे.'' अशी विनंतीही महिलेने केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com