New Delhi News: बिहार विधानसभा निवडणुकीतील एनडीएच्या ऐतिहासिक यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (ता.14 नोव्हेंबर) संध्याकाळी 6 वाजता दिल्लीतील भाजप मुख्यालयात विजयी जल्लोषासाठी उपस्थित राहिले. बिहारमध्ये एनडीएचे सरकार सत्ता स्थापन करणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) उपस्थित भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी बिहारमधील भाजप आणि जेडीयू युतीच्या एनडीएच्या प्रचंड मोठ्या विजयाचं श्रेयाचं कुणाच्या मनीध्यानी नसलेला एक नवाच फॉर्म्युला सांगितला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयातील विजयी जल्लोषात सहभागी झाले. यावेळी त्यांनी भाजप पदाधिकार्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी लोहा लोहे को काटता है. बिहारमध्ये लांगूलचालन करणारा MY फॉर्म्युला केला होता. पण आजच्या विजयाने नवीन सकारात्मक एमवाय, 'माय' फॉर्म्युला दिला आहे. तो आहे महिला आणि यूथ असं मोदी यांनी सांगितलं.
आज बिहार देशाच्या ज्या राज्यांमध्ये आहे, जिथे सर्वाधिक तरुणांची संख्या आहे. त्यात प्रत्येक जात आणि धर्माचे लोक आहेत. त्यांची इच्छा आहे. त्यांची आकांक्षा आहे. त्यांच्या स्वप्नांनी जंगलराजवाल्यांच्या सांप्रदायिकमाय फॉर्म्युल्याला उद्ध्वस्त केलं आहे. मी बिहारच्या तरुणांचं अभिनंदन करतो असं मोदी यांनी म्हटलं.
मोदी म्हणाले, बिहारच्या (Bihar) लोकांनी विकसित आणि समृद्ध बिहारसाठी मतदान केलं आहे. निवडणुकीवेळी मी जनतेला रेकॉर्ड व्होटिंग करण्याचा आग्रह केला होता. आणि बिहारच्या जनतेने सर्व विक्रम मोडले आहेत. मी बिहारच्या लोकांना एनडीएला प्रचंड विजय देण्याचा आग्रह धरला होता. बिहारच्या जनतेने माझा आग्रह मानला. बिहारने 2010 नंतरचा सर्वात मोठा जनादेश एनडीएला दिला आहे. मी खूप विनम्रपणे एनडीएच्या सर्व पक्षाच्या वतीने बिहारच्या महान जनतेचे आभार मानतो, असं मोदी यांनी यावेळी म्हटलं आहे.
पंतप्रधान म्हणाले, बिहारमध्ये जंगल राजवटीदरम्यान काय घडायचं हे तुम्हाला माहिती आहे. मतदान केंद्रांवर उघडपणे हिंसाचार होत असत. मतपेट्या लुटल्या जात होत्या. आज त्याच बिहारमध्ये विक्रमी मतदान होत आहे. ते शांततेत मतदान करत आहे. प्रत्येकाचं मतदान नोंदवलं गेलं, प्रत्येकानं त्यांच्या मर्जीनुसार मतदान केलं. पुनर्मतदानाचे आकडे देखील या बदलाची साक्ष देतात. 2005 पूर्वी शेकडो ठिकाणी पुनर्मतदान केले जात होते. 1995 मध्ये, दर हजार मतदान केंद्रांवर पुनर्मतदान करावे लागले. त्यानंतर, निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांमध्ये कुठेही पुनर्मतदान करण्याची आवश्यकता नसल्याचंही मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं.
बिहारच्या लोकांनी हा मोठा विजय देत आणि अतूट विश्वास दाखवत धुरळाच उडवून दिला आहे. आज बिहारच्या घराघरात मखानेची खीर होणार आहे. मला आनंद याचा आहे की, या ठिकाणीही मखान्याची खीर सर्वांना देण्यात आली आहे. आम्ही तर जनता जनार्दनाचे सेवक आहोत. आम्ही आपल्या कष्टानं जनतेचं हृदय खूश करत असतो. आम्ही तर जनता जनार्दनाचं हृदय चोरून बसलेलो आहोत. त्यामुळे संपूर्ण बिहारने दाखवून दिलंय की पुन्हा एकवार एनडीए सरकार. फिर एकबार एनडीए सरकार अशी घोषणा देत मोदींनी उपस्थितांमध्ये उत्साह भरला.
पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की, बिहारमध्ये आता तुष्टीकरणासाठी जागा नाही. बिहारने स्पष्टपणे जाहीर केले आहे की जनता जामिनावर असलेल्यांना पाठिंबा देणार नाही. बिहारने हे दाखवून दिले आहे की जनतेचा विश्वास कायम आहे. नवीन सरकारसह, एनडीए आता बिहारमध्ये 25 वर्षांच्या सुवर्ण प्रवासाकडे वाटचाल करत आहे. बिहारने हे सुनिश्चित केले आहे की जंगलराज बिहारच्या या महान भूमीवर कधीही परत येणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.