Rajabhau Waje : खासदार वाजेंना कोकाटेंशी सलगी करणं भोवतंय, काकांनी म्हणूनच साथ सोडली? सिन्नरमध्ये वेगळ्याच चर्चा..

Hemant Vaje joins BJP : नाशिकचे खासदार व शिवसेना(उबाठा) पक्षाचे नेते राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सिन्नरच्या राजकारणाची सगळी समीकरणे बदलली आहे.
Hemant Vaje, Rajabhau Waje, manikrao kokate- Hemant Vaje joins BJP
Hemant Vaje, Rajabhau Waje, manikrao kokate Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Sinnar Politics : सिन्नर नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मोठी राजकीय खेळी खेळली आहे. राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांना गळाला लावल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे यांनाही गळाला लावलं. आज (ता. १४) मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झाला.

माणिकराव कोकाटे व बंधू भारत कोकाटे यांचे कौटुंबिक संबध तसे आधीपासूनच चांगले नाहीत. दोघांचे राजकीय व कौटुंबिक दोन्ही पातळीवर मतभेद असल्याने भारत कोकाटे यांचे भाजपत जाणे तसे सिन्नरकरांना फारसे आश्चर्यकारक वाटले नाही. परंतु खासदार राजाभाऊ वाजे व काका हेमंत वाजे यांचे कौटुंबिक संबंध चांगले आहेत. राजकारणातही राजाभाऊ वाजे यांनी कायमच काकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले आहेत. त्यामुळे हेमंत वाजे यांचे राजाभाऊंना सोडून जाणे धक्कादायक आहे.

शिवसेनेकडून(उबाठा) नगराध्यक्षपदासाठी करण्यात आलेल्या सर्वे मध्ये हेमंत वाजे यांचे नाव दुसऱ्या स्थानावर होते. त्यामुळे शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळणे दूसर असल्याने त्यांनी भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. भाजपकडून त्यांना नगराध्यक्षदासाठी ऑफर देण्यात आली असून सगळ्या अटी मान्य केल्याचे सांगितले जाते.

Hemant Vaje, Rajabhau Waje, manikrao kokate- Hemant Vaje joins BJP
Rajabhau Waje : मनपाच्या वाटेत आता राजाभाऊ वाजे आडवे, बी. डी. भालेकर शाळेच्या जागी विश्रामगृह बांधण्यावरुन आक्रमक

परंतु हेमंत वाजे यांनी राजाभाऊ वाजे यांची साथ सोडून भाजपची वाट धरण्यामागे वेगळेच कारण असल्याची चर्चा सिन्नर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. खासदार वाजे यांनी विधानसभा व लोकसभेला माणिकराव कोकाटे यांच्यासोबत केलेल्या सलगीमुळे हेमंत वाजे हे राजाभाऊ यांच्यापासून दूर गेल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. राजकीय जाणकारांचेही तसेच काहीसे मत आहे.

हेमंत वाजे व माणिकराव कोकाटे यांचे पटत नाही. तसेच भारत कोकाटे यांचेही माणिकराव कोकाटे यांच्यासोबत वैर आहे. त्यामुळे आजवर झालेल्या निवडणुकांमध्ये या दोघांनीही माणिकरावांच्या विरोधात राजाभाऊ वाजे यांनाच साथ दिली आहे. पण यंदा वाजे यांनीच विधानसभा व लोकसभेला कोकाटे यांच्याशी सलगी केल्याचा आरोप झाला. त्याचप्रमाणे स्थानिक निवडणुकांमध्येही तसे होऊ शकते या संशयातून हेमंत वाजे व भारत कोकाटे या दोघांनीही राजाभाऊंची साथ सोडली.

Hemant Vaje, Rajabhau Waje, manikrao kokate- Hemant Vaje joins BJP
Eknath Shinde Politics : जळगावात भाजपला नडणाऱ्या आमदाराला एकनाथ शिंदेंकडून बूस्ट, सोपवली मोठी जबाबदारी

लोकसभेला माणिकराव कोकाटे यांनी राजाभाऊ वाजे यांना मदत केली व विधानसभेला माणिकराव कोकाटे यांना राजाभाऊ वाजे यांनी मदत केली व त्यामुळेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार (आता भाजपत) उदय सांगळे यांचा पराभव झाल्याचा आरोप सांगळे समर्थकांनी वाजे यांच्यावर केला होता. माणिकरावांशी अशाप्रकारे सलगी केल्यानेच वाजे यांच्यापासून त्यांचे जवळचे शिलेदार दुरावत आहेत असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com