Karnatak Election 2023:
Karnatak Election 2023:  Sarkarnama
देश

Karnatak Election 2023: पंतप्रधान मोदी 'साप' तर सोनिया गांधी...; खर्गेंच्या टिकेला उत्तर देताना भाजप आमदाराची जीभ घसरली..

सरकारनामा ब्युरो

Karnatak Assembly Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे भाजप-काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापू लागलं आहे. काँग्रेस भाजपमधील (Congress-BJP Politics) राजकारणही शिगेला पोहचले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या आरोप प्रत्यारोपांनी टोक गाठले आहे. (Congress MLA Criticized Sonia Gandhi)

अशातच एका सभेला संबोधित करताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा साप असा उल्लेख करत त्यांच्यावर टिका केली होती. त्यांच्या या टिकेला उत्तर देताना आता भाजप आमदाराचीही जीभ घसरली आहे. माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर टिका करताना भाजप आमदार बासनगौडा यांनी त्यांचा थेट विषकन्या असं संबोधत उत्तर दिलं आहे. (karnatak elelctions)

'' आज संपुर्ण जगाने पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) स्वीकारले. अमेरिकेने एकेकाळी त्यांना व्हिसा देण्यास नकार दिला होता.पण आता त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरले. मल्लिकार्जुन खर्गे मोदींची तुलना सापाशी करत आहेत आणि ते विष फेकणार असल्याचे सांगत आहेत. पण तुम्ही ज्या पक्षात नाचता, त्या पक्षाच्या सोनिया गांधी विषकन्या या आहेत का? अशी जहरी टिका बासनगौडा यांनी काँग्रेसला उत्तर दिलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी साप आहेत. तुम्हाला वाटेल ते विष नाही, पण जर तुम्ही ते चाखलं तर तुमचा मृत्यू निश्चित आहे. तुम्ही विष समजा किंवा समजू नका, पण जर तुम्ही ते घेतलं तर तुम्ही मराल. हे खरोखरच विष आहे असं तुम्ही विचार करू शकता का? मोदी एक चांगले व्यक्ती आहेत. पण हे विष चाटताच तुम्ही पूर्णपणे झोपून जाल, अशी टिका खर्गेंनी केली होती. त्यानंतर सत्ताधारी नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप होऊ लागल्यानतंर त्यांनी यावर स्पष्टीकरणही दिलं .

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विधानावर तीव्र पडसाद उमटू लागल्यानं त्यांनी लगेच घुमजावही केलं. माझी टिका भाजपची विचारधाराच्या विचारधारेवर होती, मी वैयक्तिकरित्या कोणावरही टिका केली नाही. भाजपची विचारधारा द्वेष निर्माण करणारी, फूट पाडणारी, गरीब आणि दलितांच्या मनात द्वेष निर्माण करणार आहे. या द्वेषाच्या राजकारणावर टिका केली. मी कधीच वैयक्तिक टीका करत नाही.असंही त्यांनी म्हटलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT