Narendra Modi, Raj Kapoor Sarkarnama
देश

Narendra Modi : सर पे लाल टोपी रूसी, फिर भी..! पंतप्रधान मोदींना झाली ‘एव्हरग्रीन’ आठवण...

India PM Narendra Modi in Russia Visit Vladimir Putin : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत आणि रशियातील मैत्रीची आठवण सांगताना राज कपूर आणि मिथून च्रकवर्ती यांचाही उल्लेख केला.

Rajanand More

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर असून मंगळवारी त्यांनी तेथील भारतीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ‘सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदूस्थानी’ या जुन्या गाण्याची आठवण झाली. भारत आणि रशियातील दृढ मैत्री आजही अशीच ‘एव्हरग्रीन’ असल्याचे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी सोमवारी रशियामध्ये दाखल झाले. त्यांची रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी अनौपचारिक बैठकही झाली. या बैठकीत मोदींनी त्यांच्याशी रशियन लष्करातील मुक्त करण्याबाबत चर्चा केली होती. त्यावर पुतिन यांनी सहमती दर्शविली आहे. या भेटीनंतर मंगळवारी मोदींनी भारतीयांशी संवाद साधला.

‘सर पे लाल टोपी रूसी, फिर भी दिल है हिंदूस्थानी’ हे गीत कधीकाळी येथील घरांघरात गायले जात होते, असे सांगत मोदी म्हणाले, हे गाणं जूनं असलं तरी भावना एव्हरग्रीन आहेत. त्याकाळी राज कपूर, मिथूनदा अशा कलाकारांनी भारत आणि रशियातील संस्कृतीच्या मैत्रीला मजबूत केले. भारत आणि रशियातील संबंधांना आपल्या चित्रपटांनी पुढे नेले.

आज तुम्ही सर्वजण भारत आणि रशियातील संबंधांना नव्या उंचीवर नेत आहात. दोन्ही देशांतील दोस्ती प्रत्येकवेळी मजबूत होत गेली आहे. भारत-रशियातील याच दोस्तीसाठी मी माझे प्रिय मित्र राष्ट्रपती पुतिन यांचे कौतुक करतो. त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ या संबंधांना मजबूत करण्यासाठी चांगले काम केले आहे, असे मोदींनी सांगितले.

दोघे 17 वेळा भेटलो

मागील दहा वर्षांत मी सहाव्यांदा रशियात आलो आहे. या काळात आम्ही दोघे 17 वेळा भेटलो आहोत. या सर्व बैठका विश्वास आणि सन्मान वाढवणाऱ्या ठरल्या आहेत. आपले विद्यार्थी संघर्षात फसले होते, त्यावेळी पुतिन यांनी त्यांना पुन्हा भारतात पोहचवण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे रशियातील लोक आणि पुतिन यांचा यासाठी पुन्हा आभारी आहे, असे मोदी म्हणाले.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT