PM Narendra Modi
PM Narendra Modi Sarkarnama
देश

PM Narendra Modi : मोदींची नव्या मंत्र्यांना तंबी; सकाळी 9 च्या आत ऑफिसात...

Rajanand More

New Delhi : लोकसभा निवडणुकीच्या निकालात काहीसे 'बॅकफूट'वर राहिलेल्या भाजपने अर्थात, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा दिल्लीत सत्ता राखली. परंतु, या खेपेला भाजप नव्हे, तर 'एनडीए' सरकार असल्याने पंतप्रधान मोदींनी एककल्लीपणा सोडून मित्रपक्षांना घेऊन समझोत्याने सरकार चालवतील, असे बोलले जात आहे. अशातच मोदी आता पुन्हा तेही सरकार स्थापन झाल्यानंतरच्या तिसऱ्याच दिवशी 'अॅक्शन मोड'वर आले आहे.

आपल्या सरकारमधील मंत्र्यांना शिस्त लावण्याच्या उद्देशाने रोज सकाळी तेही 9 वाजेच्या आतच ऑफिसमध्ये येण्याची तंबी दिल्याचे समजते. त्यामुळे भाजपसह मित्रपक्षांच्या मंत्र्यांनाही दिल्लीत शिस्तीत राहावे लागणार आहे. मोदींच्या या पवित्र्यामुळे अख्खे सरकारच अलर्ट झाले असून, मोदींची पहिलीवहिली झलक पाहून मंत्रीही हबकल्याचे सांगण्यात येत आहे.

निवडणुकीचा निकाल काहीही असला, तरी मोदी स्टाइल मात्र कायम राहिल्याचेच यानिमित्ताने मोदींनी दाखवून दिले आहे. मोदींनी सोमवारी सकाळी पदभार स्वीकारून शेतकऱ्यांना पहिले गिफ्ट दिले. पीएम किसान सन्मान निधीचा १७ व्या हप्त्याच्या फाईलवर त्यांनी तिसऱ्या टर्ममधील पहिली सही केली. त्यानंतर सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठकही घेतली.

मोदींनी दिलेल्या तंबीचा परिणाम मंगळवारी लगेच दिसून आला. अनेक मंत्र्यांनी नऊ वाजण्याआधीच पदभार स्वीकारून कामाला सुरूवात केली. सर्वात आधी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंत्रालय गाठले. त्यांनी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास कामकाज सुरू केले. त्यानंतर रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी सकाळी नऊ वाजता कार्यभार स्वीकारला.

गिरीराज सिंह, सुरेश गोपी, मनोहरलाल खट्टर, जयंत चौधरी, चिराग पासवान, एल मुरुगन आदी मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारून कामाला सुरूवात केली. त्यामुळे मोदींनी दिलेला सल्ल्याचे अनेक मत्र्यांनी पालन केल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी दिवसभरात अनेक मंत्री आपल्या खात्याचा पदभार स्वीकारतील.

दरम्यान, पुढील आठवड्यात संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनामध्ये मोदी सरकारकडून पुढील शंभर दिवसांचा रोड मॅप मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने मंत्रीही कामाला लागू शकतात. तर विरोधकांकडून शेअर मार्केट, दहशतवादी हल्ला, मणिपूरमधील हिंसा अशा विविध मुद्यांवर सरकराला घेरले जाऊ शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT