Delhi Police and Mysterious Animal at Rashtrapati Bhawan : नरेंद्र मोदींनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यासाठी राष्ट्रपती भवनात भव्य सोहळ्याचे आयोजन केले गेले होते. याप्रसंगी राष्ट्रपती भवनात एक प्राणी आढळून आला ज्यावरून सोमवारी दिवसभर विविध तर्कवितर्क लावले गेले, अखेर दिल्ली पोलिसांनी याबाबत खुलासा केला आहे.
पंतप्रधान मोदींबरोबर (PM Modi) त्यांच्या मंत्रिमंडळातील 71जणांचाही यावेळी शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्याकडे केवळ भारताचेच नाही तर अवघ्या जगाचेही लक्ष होते. तर हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी सुद्धा राष्ट्रपती भवनाच्या भव्य परिसरात हजारोंची गर्दी होती. यामध्ये अगदी व्हीव्हीआयपी पासून ते एनडीएच्या सर्वच घटक पक्षातील कार्यकर्त्यांचाही समावेश होता.
हा शपथविधी सोहळा आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. ते म्हणजे मंत्र्याचे शपथविधी सुरू असताना राष्ट्रपती भवनात एक प्राणी आढळून आला. भाजपचे खासदार दुर्गादास उइके हे शपथ घेतल्यानंतर सह्या करून राष्ट्रपतींच्या दिशेने जात होते.
याचवेळी राष्ट्रपती भवनातील कॉरिडॉरमध्ये एक प्राणी चालत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले. यावरून सोमवारी दिवसभर विविध तर्कवतिर्क लढवले गेले. ही बाब अनेक माध्यमांनी उचलून धरली. काहींनी म्हटले मोदींच्या शपथविधीच्या ठिकाणी बिबट्याचा शिरकाव, तर काहींनी रहस्यमयी प्राणी असंही संबोधलं.
शिवाय तो प्राणी राष्ट्रपती भवनातून जातानाचा व्हिडिओ आणि फोटो सुद्धा प्रसारमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले. यामुळे हा विषय दिवसभर चर्चेचा विषय ठरला. कारण, त्या प्राण्याबाबत राष्ट्रपती भवन किंवा सुरक्षा यंत्रणा कोणाकडूनही काहीच स्पष्टीकरण अथवा माहिती दिली गेली नाही. अखेरीस दिल्ली पोलिसांनी त्या प्राण्याबाबत खुलासा केल्या समोर आले आहे.
दिल्ली पोलिसांनी ट्वीटद्वारे म्हटले की, 'काही मीडिया चॅनल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म राष्ट्रपती भवनातील शपथविधी सोहळ्याप्रसंगी दिसून आलेल्या प्राण्याचा फोटो दर्शवून तो जंगली प्राणी असल्याचं म्हणत आहेत. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ती एक सर्वसाधरण पाळीव मांजर आहे. कृपया चुकीच्या अफवांना बळी पडू नका.'
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.