Narendra Modi Sarkarnama
देश

Narendra Modi : मोदींचा करिश्मा! ट्रम्प यांच्यासह जगातील सर्व बड्या नेत्यांना मागे टाकत केला 'विश्वविक्रम'

PM Modi social media popularity : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्पसह जगातील बड्या नेत्यांना मागे टाकत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. मोदी लाट कायम असल्याचे पुन्हा सिद्ध.

Rashmi Mane

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या विश्वात नवा इतिहास रचला आहे. इन्स्टाग्रामवर १० कोटींहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा गाठणारे ते जगातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. या यशामुळे त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय दिग्गज नेत्यांना मागे टाकत जागतिक स्तरावर आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. फेसबुक, एक्स (ट्विटर) आणि आता इन्स्टाग्रामवरही मोदींची लोकप्रियता सातत्याने वाढताना दिसत आहे.

नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली इन्स्टाग्रामवर आपले अधिकृत खाते सुरू केले. त्यानंतर गेल्या दशकभरात त्यांच्या फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढली. आज त्यांचे अकाउंट जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि सक्रिय राजकीय प्रोफाइलपैकी एक मानले जाते. विविध देशांच्या दौऱ्यांतील क्षणचित्रे, महत्त्वाच्या बैठका, सरकारी योजना, तसेच वैयक्तिक अनुभवांचे फोटो आणि व्हिडिओ ते नियमितपणे शेअर करत असतात. त्यामुळे देशासह परदेशातील लोकांशी त्यांचा थेट संपर्क राहतो.

लोकप्रियतेच्या शर्यतीत त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जो बायडेन तसेच इतर अनेक जागतिक नेत्यांना मागे टाकले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे सुमारे ४३.२ दशलक्ष फॉलोअर्स असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांचे १५ दशलक्ष, ब्राझीलचे अध्यक्ष यांचे १४.४ दशलक्ष, तुर्कीचे अध्यक्ष तय्यिप एर्दोगान यांचे ११.६ दशलक्ष, तर अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मायली यांचे ६.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. या सर्व नेत्यांच्या एकत्रित फॉलोअर्सपेक्षाही नरेंद्र मोदी यांची संख्या अधिक आहे, हे विशेष ठरते.

भारतातील इतर राजकीय नेत्यांशी तुलना केली तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सुमारे १.६१ कोटी फॉलोअर्स आहेत, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे जवळपास १.२६ कोटी फॉलोअर्स आहेत. या तुलनेत नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कितीतरी पटीने जास्त आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT