PM Modi Attacks Opposition over Corruption and Dynastic Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बिहारमध्ये प्रचाराचे बिगुल फुंकले. समस्तीपूर येथे झालेल्या पहिल्याच प्रचारसभेत त्यांनी ओबीसी कार्ड बाहेर काढत प्रचाराची दिशा निश्चित केली. तसेच विरोधकांवर बरसताना त्यांनी बिहारबाबत मोठं भाकितही केले. बिहारमध्ये येत्या निवडणुकीत इतिहास घडणार असल्याचे संकेत मोदींनी दिले आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा गुरूवारी शेवटचा दिवस होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदींच्या प्रचारसभांचा धडाका सुरू झाला. पहिल्याच प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी स्वत:सह मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर यांना मागास समाजातील असे संबोधले.
पंतप्रधान म्हणाले, मला कर्पूरी गावात भारतरत्न जननायक कर्पूरी ठाकूर यांना वंदन करण्याची संधी मिळाली. त्यांच्या आशिर्वादामुळे आज माझ्यासारखे आणि नितीश कुमार, रामनाथ ठाकूर यांच्यासारखे मागास, गरीब कुटुंबातील लोक व्यासपीठावर उभे आहेत. स्वतंत्र भारतात सामाजिक न्याय आणण्यात, वंचित आणि गरिबांना नव्या संधी देण्यात कर्पूरी ठाकूर यांची भूमिका महत्वाची राहिली आहे.
रेकॉर्डब्रेक विजय
बिहारमध्ये यावेळी नितीश कुमार यांच्या नेतृत्वामध्ये एनडीए विजयांचे सर्व जुने रेकॉर्ड मोडणार असल्याचे भाकित पंतप्रधान मोदी यांनी केले. या निवडणुकीत बिहार एनडीएला आतापर्यंतचे सर्वात मोठे बहुमत देईल, असेही मोदी म्हणाले. बिहारमध्ये असा एकही कोपरा नाही, जिथे विकासाचे कुठे काम झालेले नाही. काही ना काही काम सुरू असल्याचे तुम्हाला दिसेल, असे मोदींनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख न करता निशाणा साधला. ते म्हणाले, आम्ही जननायक कर्पूरी ठाकूर यांच्या प्रेरणेतून सुशासनातून समृध्दीकडे जात आहोत. पण दुसरीकडे आरजेडी आणि काँग्रेसवाले काय करत आहेत? ते हजारो कोटींच्या घोटाळ्यात जामीनावर सुटलेले लोक आहेत. यांच्या चोरीची सवय अशी आहे की, ते आता जननायक ही उपाधी चोरण्याच्या मागे लागले आहेत. बिहारमधील लोक जननायक कर्पूरी बाबू यांचा अपमान सहन करणार नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.