Piyush Pandey : 'अबकी बार मोदी सरकार' जाहिरातीचे निर्माते पियूष पांडे यांचे निधन

Piyush Pandey Passes Away : जाहिरात गुरु पियूष पांडे यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार मोदी सरकार ही जाहिरात विशेष गाजली होती.
Piyush Pandey Passes Away
Piyush Pandey Passes Awaysarkarnama
Published on
Updated on

Piyush Pandey News : 2014 च्या निवडणुकीत 'अबकी बार मोदी सरकार' ही लोकप्रिय जाहिराताची निर्माते, प्रसिद्ध जाहिरात गुरू पियूष पांडे यांचे निधन झाले आहे. जाहिरता जगतात आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवणारे पियुष पांडे चार दशक प्रसिद्ध जाहिरात कंपनी ओगिल्वी इंडियासोबत काम केले.

पियुष पांडे १९८२ मध्ये ओगिल्वी इंडियामध्ये सामील झाले. याआधी ते क्रिकेटपटू होते. वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी जाहिरात क्षेत्रात पदार्पण केले. एशियन पेंट्स आणि कॅडबरीसारख्या कंपन्यांच्या जाहिराती त्यांनी केल्या.

भारतातील विविधतेत एकतेचा संदेश देणारे "मिले सूर मेरा तुम्हारा" हे गाणे देखील त्यांनी लिहिले होते. हे गाणे दूरदर्शनचे थीम सॉंग बनले. त्यांनी फेविकोल आणि हच सारख्या कंपन्यांसाठी अनेक यशस्वी जाहिरात मोहिमांचे नेतृत्व देखील केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पियुष पांडे यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, पियुष पांडे हे त्यांच्या सर्जनशीलतेसाठी ओळखले जात होते. त्यांनी जाहिरातींच्या जगात प्रचंड योगदान दिले. त्यांच्याशी झालेल्या संवादांना मी वर्षानुवर्षे जपून ठेवेन. त्यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना माझी संवेदना.

Piyush Pandey Passes Away
Vivek Kolhe assembly election : 'गणेश'चा विजय अन् 2024 थांबावं लागलं; कोल्हे माय-लेकरांचा कठीण निर्णय, पण थेट केंद्रात...

अशी तयार केली 'ती' जाहिरात

पीयूष पांडे यांनी "अबकी बार मोदी सरकार" मोहीम तयार केली. "अबकी बार मोदी सरकार" ही जाहिरात 2014 च्या निवडणुकीत विशेष गाजली. त्याबाबत पियुष पांडे म्हणाले, मी रिसर्च करून मोदींच्या प्रतिमेवर आणि चेहऱ्यावर लक्ष केंद्रित केले. बोली भाषेत ओळी लिहिल्या गेल्या. ज्यामुळे सामन्या नागरिकांशी संपर्क साधणे सोपे झाले. त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या टीमने ५० दिवसांत दररोज २०० हून अधिक टीव्ही जाहिराती, १०० हून अधिक रेडिओ जाहिराती आणि १०० हून अधिक छापील जाहिराती तयार केल्या.

Piyush Pandey Passes Away
Devendra Fadnavis : दिल्ली अजून दूर आहे, 2029 पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM ; फडणवीसांची भविष्यवाणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com