Lok Sabha Speaker Om Birla Sarkarnama
देश

Lok Sabha Speaker Om Birla: सहा वर्षांपूर्वी राहुल गांधींची मोदींसोबत गळाभेट, आता 'शेक हँड'; सभागृहात टाळ्यांचा कडकडाट..

PM Narendra Modi congress leader Rahul Gandhi Shake Hands Speaker Om Birla: तुम्ही मला शिव्या देऊन बोलू शकता. माझ्या मनात तुमच्याविषयी राग-तिरस्कार नाही, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींकडे जाऊन त्यांची गळाभेट घेतली.

Mangesh Mahale

'तुम्ही मला शिव्या देऊन बोलू शकता. त्याने मला फरक पडत नाही. पण माझ्या मनात तुमच्याविषयी राग-तिरस्कार नाही," असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पार्लमेंटमध्ये गळाभेट घेतल्याचे आपल्याला आठवत असेल. त्यानंतर राहुल गांधी यांनी आज मोदीसोबत ‘शेक हँड’ केला अन् सभागृहात टाळ्याचा कडकडाट झाला.

18 व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला (Om Birla) यांची निवड झाल्यानंतर त्यांनी मोदी आणि राहुल गांधी यांनी त्यांच्या आसनापर्यंत घेऊन गेले. ही ससंदेची परंपरा आहे. त्यापूर्वी विविध मुद्यांवरुन एकमेकांवर तुटून पडणाऱ्या मोदी-गांधी यांच्यातील ‘शेक हँड’कडे सगळ्यांच्या नजरा होत्या. दोन्ही नेत्यामध्ये झालेला हा ‘शेक हँड’ ऐतिहासिक ठरला. ओम बिर्ला यांचे अभिनंदन करीत दोन्ही नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

सहा वर्षांपूर्वी राहुल गांधी यांनी सभागृहात मोदींची गळाभेट घेतली होती. मोदी सरकारविरोधातील अविश्वास ठरावावर चर्चा सुरु असताना राहुल गांधीनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांचा उल्लेख करत मोदींसह भाजप सरकारवर चौफेर टीका केली होती.

"तुमच्यासाठी मी पप्पू असेन. तुम्ही मला शिव्या देऊन बोलू शकता. त्याने मला फरक पडत नाही. पण माझ्या मनात तुमच्याविषयी राग-तिरस्कार नाही," असं म्हणत राहुल गांधी आपल्या जागेवरुन उठले त्यांनी मोदींकडे जाऊन त्यांची गळाभेट घेतली.

यानंतरही मोदींनी हसत हसत राहुल यांच्यासोबत ‘शेक हँड’केलं.त्यांच्या पाठीवर थाप मारली. मग आपल्या जागेवर येत, ही आहे 'हिंदू संस्कृती' असं म्हणत राहुल गांधींनी भाषण संपवलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT