Varsha Bungalow: 'वर्षा' बंगल्यावर बैठकांचा धडाका सुरु; मध्यरात्री दोन तास खलबते

CM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Meeting: अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडीला कसे कोंडीत पकडावे, त्याची रणनीती यावेळी तिन्ही नेत्यांनी निश्चित केल्याची माहिती मिळाली.
CM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Meeting
CM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar MeetingSarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला हत्तीचं बळ मिळालं आहे. शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी महायुतीला घेरण्यासाठी आघाडी आक्रमक झाली आहे.

विविध मुद्यांवरुन कोंडी करु पाहणाऱ्या आघाडीच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या 'वर्षा'बंगल्यावर महायुतीच्या नेत्यांच्या बैठकांचा धडाका सुरु आहे. मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये मंगळवारी मध्यरात्री सुमारे दोन तास खलबते झाल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य विधिमंडळाचे हे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यासाठी महत्वाचे ठरणार आहे.

बंद दाराआडच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार, तरतुदी, महत्वाचे मुद्दे, कोणते निर्णय घ्यायचे, विरोधकांच्या प्रश्नांना कसं सामोरं जायचे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली.

CM Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Meeting
PM Modi: कोण राहुल गांधी? म्हणणाऱ्या मोदींना आता राहुल यांना रामराम करावं लागेल...

राज्यातील राजकारणांसह अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडीला कसे कोंडीत पकडावे, त्याची रणनीती यावेळी तिन्ही नेत्यांनी निश्चित केल्याची माहिती मिळाली.

अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करावा, अशी महायुतीतील अनेक आमदारांची अपेक्षा होती. पण मंत्रिमंडळांचा विस्तार हा अधिवेशनानंतरच घेतला जाणार असल्याचे महायुतीच्या बैठकीत ठरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com