PM Narendra Modi
PM Narendra Modi Sarkarnama
देश

Video : भाषणादरम्यान टेलिप्रॉम्प्टर बंद पडताच पंतप्रधान मोदींची उडाली तारांबळ

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे सोमवारी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (World Economic Forum) व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विशेष भाषण झाले. कोरोना (Corona) काळातही भारताने आर्थिक वाढ कायम राखल्याचा मुद्दा मांडत पंतप्रधानांनी जगाला आशेचा किरण दाखवला. या भाषणातून पंतप्रधानांनी जगाला सकारात्मक संदेश दिला. पण या भाषणापेक्षा अचानक टेलिप्रॉम्प्टर (Teleprompter) बंद पडल्याने मोदींचा गोंधळ उडाल्याचा व्हि़डीओ अधिक व्हायरल झाला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी भाषणादरम्यान भारताच्या उल्लेखनीय कामांचा आढावा घेतला. भारतात गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अत्यंत उपयुक्त आहे. भारत हा संपूर्ण जगाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे. कोरोना काळात जगातील अनेक देशांना औषधे अन् लशींचा पुरवठा करत भारताने मोठी कामगिरी केल्याचे मोदींनी भाषणादरम्यान सांगितले. भारतीयांनी कोरोनाशी लढा कसा यशस्वी केला हेही मोदींनी सांगितले.

कोरोनाशी लढताना भारतीयांची इच्छाशक्ती चांगली असल्याचा उल्लेख केल्यानंतर लगेचच टेलिप्रॉम्प्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडला. त्यामुळे भाषण देत असतानाच मोदींना थांबावे लागले. काही सेकंद नेमकं काय घडलं, हे लक्षात आले नाही. त्यामुळे काहीशा गोंधळलेल्या स्थितीत आणि थोड्या संतापलेल्या नजरेने टेलिप्रॉम्प्टरकडे पाहू लागले. त्यांनंतर त्यांनी दोन्ही हात वर करत कानात हेडफोन लावेल आणि समोरच्यांना व्यवस्थित ऐकू येत आहे का, अशी विचारणा केली.

समोरून भाषण व्यवस्थित ऐकू येत असल्याचे सांगण्यात आले. पण त्यानंतर कदाचित काहीसा तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात आल्याने आयोजकांनीही मोदींचे भाषण मध्येच थांबवत पुढील कार्यक्रमाला सुरूवात केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय मंचावर तांत्रिक बिघाडामुळे मध्येच भाषण थांबवावे लागल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे.

जगातील सर्वात मोठे डिजिटल व्यासपीठ

पंतप्रधान मोदी भाषणादरम्यान बोलताना म्हणाले की, आज भारत जगाला विक्रमी सॉफ्टवेअर इंजिनिअर पाठवत आहे. पन्नास लाखांहून अधिक सॉफ्टवेअर डेव्हलपर्स भारतात काम करत आहे. मागील सहा महिन्यांत दहा हजारांहून अधिक स्टार्ट-अप्सची नोंद झाली आहे. 2014 पर्यंत ही संख्या मोजकीच होती. आता जवळपास 60 हजारांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. कोरोना काळात भारताने वन अर्थ, वन हेल्थ च्या व्हिजनवर चालत अनेक देशांना आवश्यक औषधांचा पुरवठा केला. लशींचा पुरवठा करून कोट्यवधी लोकांचा जीव वाचवला. भारत हा जगातील तिसरा मोठी औषध उत्पादक देश बनला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT