स्वेच्छानिवृत्ती घेत भाजपमध्ये प्रवेश करताच IPS अधिकाऱ्यानं केला गौप्यस्फोट

निवृत्तीसाठी नऊ वर्षांचा अवधी असतानाच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत राजकारणात प्रवेश केला आहे.
Asim Arun
Asim ArunSarkarnama
Published on
Updated on

लखनौ : आयपीएस (IPS) किंवा आयएएस (IAS) अधिकाऱ्यांचे राजकारणाशी नाते जुनेच आहे. स्वेच्छानिवृत्ती घेत तसेच निवृत्तीनंतर अनेकांनी राजकारणात उडी घेत आमदारकी, खासदारकी मिळवली आहे. मागील काही वर्षात अनेक अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने भाजपला (BJP) पसंती दिली आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Election) निमित्ताने हे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. शनिवारी भाजपमध्ये कानपूरच्या माजी पोलीस आयुक्तांनी प्रवेश केला.

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) नुकत्याच उत्तर प्रदेशसह (Uttar Pradesh) इतर चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. ही घोषणा ज्यादिवशी झाली त्याच दिवशी आयपीएस अधिकाऱ्याने राज्य सरकारकडे स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला. त्यानंतर आठवडाभरातच हा अर्ज मंजूरही झाला. तर दुसऱ्याच दिवशी या आयपीएस अधिकाऱ्याने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना विधानसभेचे तिकीटही मिळण्याची शक्यता आहे. असिम अरूण असं या अधिकाऱ्याचे नाव आहे.

Asim Arun
फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या फटेच्या पीयूष गोयलांसोबतच्या फोटोने अनेकांचा केला घात

माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) आणि भाजपेच प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंग यांच्या उपस्थितीत असिम अरूण (Asim Arun) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आपल्या कारकीर्दीतील इतर सरकारच्या तुलनेत योगी सरकार खूप वेगळे असल्याचे प्रमाणपत्रही त्यांनी यावेळी दिले. मला काही नेते, कार्यकर्त्यांचे गुन्हेगारांसाठी फोन येत होते. कार्यकर्ते पोलीस ठाण्यात येऊन बसायचे. अनेकवेळा गुन्हेगारांना सोडण्याच्या सुचना मिळत होत्या, असा गौप्यस्फोट असिम अरूण यांनी केला आहे. आताच्या सरकारमधील नेत्यांकडून एकदाही फोन आला नाही, असंही त्यांनी सांगितले.

Asim Arun
विशाल फटेचा खुद्द पीयूष गोयल यांनीच केला होता सन्मान

पोलीस सेवेत असताना अनेक कामे करता आली नाहीत. आता राजकारणात येऊन ही कामे करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा मार्ग कठीण असला तरी आता तो सोडणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ते 1994 च्या तुकडीचे अधिकारी असून सेवानिवृत्तीसाठी अजून नऊ वर्षांचा कालावधी बाकी होता. सध्या ते कानपूरचे पोलीस आयुक्त होते. पण त्याआधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. ते एडीजी रँकचे अधिकारी होते.

उत्तर प्रदेश एटीएसचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांनी 8 जानेवारी रोजी स्वेच्छानिवृत्तीसाठी सरकारकडे अर्ज केला होता. सेवेत असताना उमेदवारी देता येणार नसल्याने आठवडाभरातच त्यांच्या अर्जावर निर्णय झाला. ते उत्तर प्रदेशात कनौजचे रहिवाशी असून याच मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com