BJP : Narendra Modi  Sarkarnama
देश

Narendra Modi News : पंतप्रधान मोदींचे भाजप कार्यकर्त्यांना 100 दिवसांचे टार्गेट; 'नव्या मतदारांना...'

BJP Party National Convention : 100 दिवस नव्या जोशात, नव्या उत्साहाने आणि नव्या ऊर्जेने काम करायचे आहे...

Chetan Zadpe

Delhi News : राजधानी दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाला संबोधित करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारणारे भाषण दिले आहे. या कार्यक्रमासाठी त्यांनी सर्वांचे अभिनंदनही केले. तसेच पक्षासाठी कार्यकर्त्यांना झोकून काम करायचे आहे, असेही सांगितले. (Latest Marathi News)

पंतप्रधान मोदी म्हणाले की, "पुढील 100 दिवस सर्वांनी एकत्र येऊन नव्या उमेदीने काम करायचे आहे. आज पक्षाच्या विविध राज्यातील संघटनांच्या अहवालामुळे मी खूप प्रभावित झालो आहे. देशभरात भाजपचे कार्यकर्ते सत्तेत असूनही ते जमिनीवर खूप मेहनत घेऊन कार्य करत असतात. आपल्याला पक्षाला नव्या मतदारांपर्यंत घेऊन जायचं आहे. नव्या मतदारांना पक्षाशी जोडायचं आहे. भाजपचा कार्यकर्ता हे काम भारतमातेसाठी करत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अबकी बार-400 पार -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले. मोदींनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पुढील 100 दिवस नव्या जोशात, नव्या उत्साहाने आणि नव्या ऊर्जेने काम करण्यास सांगितले आहे. मोदी म्हणाले, "आपल्याला प्रत्येक वर्ग, प्रत्येक समाज आणि प्रत्येक पंथावर विश्वास ठेवायला हवा. एनडीएला 400 च्या पुढे न्यायचे असेल तर भाजपलाच 370 चा टप्पा पार करावा लागेल. (BJP)

अमित शहांचे भाषण -

यावेळी मोदींनी (Narendra Modi) जैन संत आचार्य विद्यासागर यांनाही त्यांनी आदरांजली वाहिली. आज रविवारी संत आचार्य विद्यासागर यांचे निधन झाले. पंतप्रधान मोदींच्या आधी गृहमंत्री अमित शहा यांनी या अधिवेशनात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. आज रविवारी भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे.

(Edited by - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT