PM Narendra Modi covid unity remark  Sarkarnama
देश

PM Modi on Iran War : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भीती; म्हणाले, कोरोनासारखी एकजूट, आता पुन्हा सज्ज राहण्याची आवश्यकता...

Iran war impact india economy : आपल्याला खूप सावधान आणि सतर्कही राहावे लागणार आहे. या स्थितीचा फायदा उचलणारे खोटं पसरविण्याचा प्रयत्न करतील. अशा लोकांच्या प्रयत्नांना यशस्वी होऊ द्यायचे नाही, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.

Rajanand More

Narendra Modi covid unity remark : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संघर्षाने भारतासमोरही आव्हान उभे केले आहे. प्रामुख्याने इंधन तुटवड्याबाबत भारताकडून चिंता व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच सोमवारी लोकसभेत देशाची भूमिका स्पष्ट केली. सध्याच्या युध्दाच्या स्थितीवर चिंता व्यक्त करतानाच भारत आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी डिप्लोमसीबाबत भारताची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, सुरूवातीपासूनच आपण या संघर्षावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मी पश्मिम आशियातील नेत्यांची चर्चा केली आहे. तणाव आणि संघर्ष संपविण्याचा आग्रह मी केला आहे. भारताने नागरिक, ऊर्जा आणि वाहतुकीशी संबंधित हल्ल्यांचा विरोध केला आहे.

व्यावसायिक जहाजांवरील हल्ला आणि होर्मुज सामुद्रधुनीसारख्य जलमार्गातील अडथळे अस्वीकार्य आहे. भारत डिल्पोमसीच्या माध्यमातून युध्दाच्या या स्थितीतही जहाजांच्या वाहतुकीसाठी प्रयत्न करत आहेत. भारत नेहमीच मानवतेच्या हितासाठी आणि शांततेसाठी आवाज उठवत आला आहे. चर्चा आणि कुटनीतीच या समस्येचा मार्ग आहे, असे मोदी म्हणाले.

असे संकट येतात तेव्हा काही तत्व याचे याचा गैरफायदा उलचण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी कायदा-सुव्यवस्था सुनिश्चित करणाऱ्या सर्व एजन्सी अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. कोस्टर सिक्युरिटी, बॉर्डर सिक्युरिटी, सायबर सिक्युरिटी, स्ट्रॅटेजिक इन्स्टॉलेशन अशी सर्व प्रकारची सुरक्षा वाढविण्यात आली आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

युध्दामुळे जगात जी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याचा प्रभाव बराच काळ राहण्याची शक्यता आहे, अशी भीती व्यक्त करत पंतप्रधान मोदी म्हणाले, आपल्याला त्यासाठी सज्ज राहायला हवे, आपल्याला एकजुट राहायला हवे. आपण कोरोनो काळातही एकजुटीने अशा आव्हानांचा सामना केला आहे. आता पुन्हा आपल्याला त्यापध्दतीने सज्ज राहण्याची आवश्यकता आहे. संयम आणि शांत मनाने आपल्याला प्रत्येक आव्हानाचा सामना करायचा आहे. हीच आपली ओळख आहे, ही आपली ताकद आहे.

आपल्याला खूप सावधान आणि सतर्कही राहावे लागणार आहे. या स्थितीचा फायदा उचलणारे खोटं पसरविण्याचा प्रयत्न करतील. अशा लोकांच्या प्रयत्नांना यशस्वी होऊ द्यायचे नाही. देशातील सर्व राज्य सरकारांनी अशा स्थितीत काळाबाजार करणारे सक्रीय होता. त्यासाठी कडक नियंत्रण आवश्यक आहे. जिथून अशा तक्रारी येतात, तिथे लगेच कारवाई व्हायला हवी. देशातील प्रत्येक सरकार आणि प्रत्येक नागरिक जेव्हा एकत्रित येईल, तेव्हा आपण प्रत्येक आव्हानाला आव्हान देऊ शकतो, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT