Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणी CM फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा; म्हणाले, ज्याचा दुरान्वयेही संबंध, त्याला…

Devendra fadnavis statement : देवेंद्र फडणवीस यांनी आपले निवेदन थांबविल्यानंतर विरोधी बाकांवरून काही सदस्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.
Ashok Kharat properties investigation
Ashok Kharat properties investigationSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचे पडसाद सोमवारी विधानसभेतही उमटले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडत खरात प्रकरणी भाष्य केले. त्यावर काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनीही जोरदार निशाणा साधला. याप्रकरणी सभागृहात चर्चा घडवून आणण्याची विनंती विरोधी पक्षातील सदस्यांनी केली.

विरोधकांनी आक्रमकपणे अशोक खरात प्रकरण उचलून धरल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच विधानसभेत यावर भाष्य केले. खरातला ट्रॅप लावून अटक केल्याचे सांगताना त्यांनी पोलिसांनी आधीपासून तयारी केल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, तथाकथित तांत्रिक मांत्रिक भोंदूबाबा अशोक खरात या व्यक्तीच्या संदर्भात जो विषय घडलेला आहे, तो अत्यंत गंभीर आहे.

या व्यक्तीने आपल्या तथाकथित शक्तींचा दुरूपयोग करून आणि दिशाभूर करून अनेक महिलांसोबत गैरव्यवहार केल्याचे समोर येत आहे. यासंदर्भातील कारवाई पोलिसांनी ट्रॅप तयार करून केली आहे. यामध्ये महिलांची फसवणूक झाली होती, त्या समोर यायला तयार नव्हत्या. त्यांना धीर दिला. काही महिलांनी तक्रार केली आहे. आणखी काही महिला तक्रार करतील, असे फडणवीस म्हणाले.

Ashok Kharat properties investigation
Satara ZP Election row : लागलंय, मला मारलंय! विधानसभेत देसाई संतापले, शिंदेंनीही घाव घातला; त्याचवेळी फडणवीस आले अन्...

याबाबत कारवाई जरी आता झाली असली तरी तयारी आधीपासूनच सुरू होती. अटकेच्या अगोदरच म्हणजे १० मार्चला दुसऱ्या जिल्ह्यातील तक्रारीचा उपयोग करून एनओसीही काढून ठेवला होतो, जेणेकरून त्याला बाहेर पळता येऊ नये. याप्रकरणी सभागृहात सविस्तर निवेदन करू, असे फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीस यांनी आपले निवेदन थांबविल्यानंतर विरोधी बाकांवरून काही सदस्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांचे ऐकून घेत फडणवीस म्हणाले, मी नेहमी क्लिन चीट देत नाही. जो क्लिन असतो त्यालाच क्लिन चीट मिळते. अशी कुठलीच चीट माझ्याकडे नाही. याच्यात ज्याचा दुरान्वयेही संबंध असेल, त्यालाही सोडले जाणार नाही, अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली.

Ashok Kharat properties investigation
Ashok Kharat : शंभर रूपये किलोने आणायचा, एक चिंचोका 1 लाखाला विकायचा... अशोक खरातने भाविकांना कसं लुटलं?

दरम्यान, विजय वडेट्टीवार म्हणाले, अशोक खरात या भोंदूबाबाने जवळपास १०० हून अधिक व्हिडीओ क्लिप पुढे आल्या आहेत. देवाच्या धर्माच्या नावाने फसविणारे भोंदू तयार होत आहेत. यामध्ये राजकीय, आयएएस, आयपीएस अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी आहेत. भोंदूबाबाला जेजे भेटले, व्हिडीओ क्लिप बाहेर आल्या आहेत. त्या सर्वांचे सीडीआर तपासले पाहिजे.

या भोंदूगिरीमुळे पूर्ण महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर तीन अधिकारी कारवाई होऊ नये म्हणून मदत करत होते. केवळ एसआयटी नेमून हे प्रकरण संपणार नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षा अशा प्रवृत्तीचे समर्थन करतात. अनेक मंत्री भोंदूबाबाचे भक्त आहेत. जेवढे सहभागी आहेत, त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत. त्यांना सहआरोपी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com