India fuel stock update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत पश्चिम आशियातील युध्दजन्य स्थितीवर निवेदन दिले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांनी राज्यसभेत निवेदन देत पुन्हा एकदा या स्थितीचे दुरागामी परिणाम होणार असल्याचे संकेत दिले. तसेच क्षणाक्षणाला स्थिती बदलत असून भारतीयांना येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज राहायला हवे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.
पंतप्रधान मोदी यांनी आज भारताकडे उपलब्ध इंधनसाठ्याचीही माहिती दिली. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांमध्ये उपाययोजना करण्यासाठी कालच नऊ गट स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. या संकटामुळे भारतासमोर आव्हान उभे राहिले आहे. अशा स्थितीत भारत सरकारकडून देशात इंधन आणि गॅसचा पुरवठा सुरळीत राहील, हा प्रयत्न केला जात आहे.
पश्चिम आशियातील स्थितीचा सामना करण्यासाठी भारत सरकार सजग आणि तत्पर आहे. देशात सध्या ५३ लाख मेट्रिक टन इतका पेट्रोलियमचा आपत्कालीन साठा असल्याची माहितीही पंतप्रधानांनी राज्यसभेत दिली. शक्य त्या मार्गाने पेट्रोल आणि गॅसची उपलब्धता सुनिश्चित केली जात आहे. या युध्दाचे दुरागामी परिणाम होण्याची शक्यता आहे, असे मोदी म्हणाले.
टीम इंडियाला आव्हान
पंतप्रधान मोदींनी यावेळी देशातील सर्व राज्यांनाही आवाहन केले. कोरोना काळामध्ये केंद्र सरकारसह सर्व राज्यांनी एकत्रितपणे ‘टीम इंडिया’ प्रमाणे संकटाचा सामना केला. याच भावनेतून पुढेही काम करायचे आहे. आपल्याला विकासाचा गती कायम ठेवण्यासाठी वेगाने सुधारणा कराव्या लागतील. ही टीम इंडियाची मोठी परीक्षा असल्याचे मोदी म्हणाले.
आखाती देशांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय असल्याचे सांगत मोदी म्हणाले, आतापर्यंत ३.७५ लाख भारतीय मायदेशी सुरक्षितपणे परतले आहे. इराणमधून एक हजार भारतीय परतले असून त्यामध्ये ७०० जण वैद्यकीय शिक्षण घेणारे युवक आहेत. हल्ल्यामध्ये काही काही भारतीयांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.