Election Commission : धक्कादायक : निवडणूक आयोगाने पक्षांना पाठविलेल्या पत्रावर भाजपचा शिक्का; कबूली देत अधिकारी सस्पेंड

BJP stamp letter issue : भाजपचा शिक्का असलेल्या या पत्रामुळे निवडणूक आयोगावर नामुष्की ओढविली आहे. हे पत्र व्हायरल होताच आयोगानेही खुलासा केला आहे.
BJP stamp letter issue
BJP stamp letter issue Sarkarnama
Published on
Updated on

Politics latest controversy : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली असताना धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना पाठविलेल्या एका अधिकृत पत्रावर चक्क भाजपचा शिक्का आढळून आला आहे. त्यामुळे देशात यावरून राजकीय घमासान सुरू झाले आहे. निवडणूक आयोगानेही ही टेक्निकल एरर असल्याचे सांगत चूक मान्य केली आहे.

निवडणूक आयोगाने १९ मार्च २०१९ रोजी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविलेले हे पत्र असून सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाले आहे. याच पत्रावर केरळ भाजपचा शिक्का आहे. हे पत्र नुकतेच आयोगाने राजकीय पक्षांना पाठविले आहे. केरळमधील सीपीआयएम या पक्षाने सुरूवातीला हे पत्र सोशल मीडियात शेअर करत आयोगावर निशाणा साधला होता.

भाजपचा शिक्का असलेल्या या पत्रामुळे निवडणूक आयोगावर नामुष्की ओढविली आहे. हे पत्र व्हायरल होताच आयोगानेही खुलासा केला आहे. केरळच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सोशल मीडियात याबाबत स्पष्टीकरण देताना ही टेक्निकल एरर असल्याचे म्हटले आहे. ही चूक लक्षात आल्यानंतर तातडीने ती सुधारण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

BJP stamp letter issue
Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट; IPS सातपुतेंनी जारी केले 2 मोबाईल क्रमांक अन् 3 पोलीस अधिकाऱ्यांची नावे...

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील या प्रकरणाशी संबंधित एका सहायक सेक्शन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकारी निलंबित असेल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे. केरळ भाजपने नुकतीच एका जुन्या नियमांचा उल्लेख असलेली कागदपत्रे जमा केली होती. त्यावर भाजपचा शिक्का होता. तीच कागदपत्रे चुकून अन्य राजकीय पक्षांना पाठविण्यात आल्याचा खुलासा आयोगाने केला आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे विरोधी पक्षांच्या हाती आयते कोलित मिळाले आहे. काँग्रेसने यावरून आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. काँग्रेसने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ही चूक नसून संशयास्पद प्रकार आहे. या प्रकारामुळे घटनात्मक संस्थेची निष्पक्षता आणि विश्वसनीयतेवर गंभीर प्रश्न उपस्थित राहतात.

BJP stamp letter issue
PM Modi on Iran War : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भीती; म्हणाले, कोरोनासारखी एकजूट, आता पुन्हा सज्ज राहण्याची आवश्यकता...

आयोगाच्या अधिकृत पत्रावर एखाद्या राजकीय पक्षाचा शिक्का कसा असू शकतो? निवडणूक आयोग भाजपच्या कठपुतलीप्रमाणे का वागत आहे? निवडणूक आयोग देशातील जनतेला याचे स्पष्टीकरण देऊ शकते का, असे सवाल काँग्रेसने उपस्थित केले आहे. त्याचप्रमाणे अन्य राजकीय पक्षांनीही हा मुद्दा उचलून धरत आयोगाला घेरले आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com