Prime Minister Narendra Modi announces the ₹1 Lakh Crore RDI Scheme to strengthen India’s innovation and research ecosystem, encouraging private sector participation. Sarkarnama
देश

PM Modi News : पंतप्रधान मोदींनी सुरू केली तब्बल 1 लाख कोटींची योजना; खासगी क्षेत्राला मिळणार बूस्ट

PM Narendra Modi Launches ₹1 Lakh Crore RDI Scheme संशोधनाला अधिक सोपं करण्यावर आपला भर असल्याचे सांगत मोदी म्हणाले, भारतात नवकल्पनांना उभारी मिळावी, नवी इकोसिस्टीम विकसित व्हावी, यासाठी प्रयत्न केला जात आहे.

Rajanand More

थोडक्यात महत्वाचे :

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या संशोधन, विकास आणि नवकल्पना (RDI) क्षेत्रासाठी एक लाख कोटी रुपयांच्या निधीची घोषणा करत मोठी झेप घेतली.

  2. खासगी क्षेत्रावर भर : या योजनेचा उद्देश खासगी उद्योग, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्यांना संशोधन व विकासात प्रोत्साहन देणे आहे.

  3. दीर्घकालीन प्रकल्पांना चालना : योजनेअंतर्गत शून्य किंवा कमी व्याजदरावर दीर्घकालीन कर्जे आणि भांडवली गुंतवणूक उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्याचा फायदा देशातील संशोधन इकोसिस्टमला होईल.

Government’s Vision for India’s Innovation-Led Growth : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशभरातील संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी मोठे गिफ्ट दिले. त्यांनी देशाच्या संशोधन आणि विकास क्षेत्राला चालना देण्यासाठी तब्बल एक लाख कोटी रुपयांच्या योजनेची सुरूवात केली. संशोधन, विकास आणि नवकल्पना योजना निधीची पंतप्रधान मोदींनी सोमवारी घोषणा केली.

नवी दिल्ली येथे आयोजित इमर्जिंग सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह 2025 चे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी या योजनेची सुरूवात केली. देशातील खासगी क्षेत्रात संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाला चालना देण्याचा यामागचा उद्देश आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, डिजिटलसाठी जगभरातील सर्वाधिक चांगल्या पायाभूत सुविधा भारतामध्ये आहेत. विज्ञान जेवढे अधिक दूरवर पोहचते, नवकल्पना सर्वसमावेषक बनतात, तंत्रज्ञानाच्या कक्षा रुंदावतात, तेव्हा महान कामगिरीचा पाया रचला जातो. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्यासाठी भारत अग्रभागी आहे. भारत आता तंत्रज्ञानाचा केवळ ग्राहक नाही, असे मोदींनी सांगितले.

संशोधनाला अधिक सोपं करण्यावर आपला भर असल्याचे सांगत मोदी म्हणाले, भारतात नवकल्पनांना उभारी मिळावी, नवी इकोसिस्टीम विकसित व्हावी, यासाठी प्रयत्न केला जात आहे. भारत मानवकेंद्रित एआयसाठी जागतिक दर्जाचे फ्रेमवर्क तयार करत असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले.

RDI योजनेची वैशिष्ट्ये –

योजनेतील निधीची तरतूद सहा वर्षांसाठी करण्यात आलेली आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत २० हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. दीर्घकालीन शून्य किंवा कमी व्याजदर असलेली कर्जे, भांडवली गुंतवणूक आणि डीप-टेक फंड ऑफ पंडस्मधील योगदान आदींचा या योजनेत समावेश आहे.

योजनेअंतर्गत अनुदान किंवा अल्पकालीन मुदतीचे कर्जे दिली जाणार नाही. स्टार्ट अप्स आणि संशोधन, तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्यांच्या दीर्घकालीन प्रकल्पांसाठी या योजनेचा खासगा क्षेत्रात फायदा होणार आहे. 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Q1: RDI योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
A: संशोधन, नवकल्पना आणि तंत्रज्ञान विकासात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवणे हा प्रमुख उद्देश आहे.

Q2: या योजनेसाठी किती निधी राखून ठेवण्यात आला आहे?
A: तब्बल एक लाख कोटी रुपये.

Q3: या योजनेत कोणाला फायदा होईल?
A: स्टार्टअप्स, संशोधन संस्था, आणि खासगी तंत्रज्ञान कंपन्यांना दीर्घकालीन गुंतवणुकीचा फायदा होईल.

Q4: या योजनेत अनुदान दिले जाईल का?
A: नाही, ही योजना दीर्घकालीन कर्ज आणि गुंतवणुकीवर आधारित आहे, अनुदानावर नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT