

Maharashtra politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) व भाजपमधील तणाव वाढू लागला आहे. त्याला कारण म्हणजे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी घेतलेली एकला चलो ची भूमिका आहे. कोणत्याही परिस्थिती पाचोरा -भडगाव मतदारसंघात युती होणार नाही अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. पाचोऱ्यात झालेल्या निर्धार मेळाव्यातही त्यांनी पुन्हा तेच ठणकावून सांगितलं...
लोकसभेला आम्ही पाचही शिवसेनेच्या आमदारांनी जळगाव जिल्ह्यात भाजपच्या उमेदवारांचे काम केलं. जळगावचे दोन्ही उमेदवार निवडून आले. पण विधानसभेला माझ्या मतदारसंघात भाजपने बंडखोरी केल्याचे सांगत आपल्यावर झालेल्या अन्यायाची गोष्ट त्यांनी मेळाव्यात सांगितली. या मेळाव्यात पालकमंत्री गुलाबराव पाटीलही उपस्थितीत होते. मग काय त्यांनाही राहवलं नाही..त्यांनीही आपल्या भाषणात भाजपने त्यांच्यावर केलेल्या अन्यायाची गोष्ट सांगितली...
गुलाबराव पाटील म्हणाले, किशोर पाटील यांचा राग योग्य असून भाजपने माझ्या मतदारसंघात चांगले काम केले, पण किशोर पाटलांच्या मतदारसंघात काम केले नाही, हे मी मान्य करतो. माझ्यावरही भाजपने एकदा असाच अन्याय करण्याचा प्रयत्न केला होता. त्या विरोधात आवाज उठविण्यासाठी मी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जळगावमधील सभेत गोंधळ घातला होता. कोणी पाच वर्षे मेहनत करत असेल आणि ऐनवेळी कोणी वाटेत अडचणी निर्माण करत असेल तर प्रत्येकाच्या राजकीय करियरचा विषय असतो.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, किशोर पाटलांच्या सांगण्यात एक तडतड आणि कळकळ आहे. कितीही त्रास देणारे येऊ द्या आम्ही पण कच्च्या गुरूचे चेले नाही. आम्ही प्रेम करतो तर मोकळ्या मनाने करतो. काही जण तर ताटात जेवून गद्दारी करतात. डोक्यावरील केस गेले म्हणून म्हातारे समजू नका. अजूनही वाघ जिवंत आहे. शिवसैनिक माझ्यातही आहे. परंतु, मंत्री असल्याने मला जबाबदारीने वागावे व बोलावे लागते. मात्र, सध्या जे काही सुरु आहे, ते आपण राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचविणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
दरम्यान किशोर पाटलांनी मतदारसंघात कामे केली आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात कितीही लोक एकत्र आले तरी, पाचोरा-भडगाव मतदारसंघात त्यांना घवघवीत यश मिळेल, असा विश्वासही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. एकंदरीतच किशोर पाटलांच्या सुरात सुर मिसळवत गुलाबरावांनीही भाजपमध्ये आपल्यावर झालेल्या अन्यायाची भडास मोकळी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.